मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Heart attack or Heartburn : हृदयविकाराचा झटका आणि छातीत होणारी जळजळ यात काय फरक असतो? अशी ओळखा लक्षणे

Heart attack or Heartburn : हृदयविकाराचा झटका आणि छातीत होणारी जळजळ यात काय फरक असतो? अशी ओळखा लक्षणे

हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ होणे या दोन्हीमध्ये छातीत दुखण्याचे लक्षण जवळपास सारखेच असते. हा फरक समजून घेण्यासाठी दोन्हीची लक्षणे बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे.

हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ होणे या दोन्हीमध्ये छातीत दुखण्याचे लक्षण जवळपास सारखेच असते. हा फरक समजून घेण्यासाठी दोन्हीची लक्षणे बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे.

हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ होणे या दोन्हीमध्ये छातीत दुखण्याचे लक्षण जवळपास सारखेच असते. हा फरक समजून घेण्यासाठी दोन्हीची लक्षणे बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : अनेक लोक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि छातीत जळजळ (Heartburn) होण्याच्या लक्षणांमधील फरक ओळखू शकत नाहीत आणि यामुळे उपचारांना उशीर होतो. हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ होणे या दोन्हीमध्ये छातीत दुखण्याचे लक्षण जवळपास सारखेच असते. हा फरक समजून घेण्यासाठी दोन्हीची लक्षणे बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. याबाबत 'आज तक'ने बातमी दिली आहे.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) म्हणजे काय - हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमन्यांमधील आजारामुळे येतो. या रक्तवाहिन्या हृदयापर्यंत ऑक्सिजनद्वारे रक्त पोहोचवण्याचे ऊर्जा देण्याचे काम करतात. कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये हृदयाच्या स्नायूपर्यंत रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदयाचे ठोके बंद होऊ शकतात. याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात. हृदयविकाराचा झटका आल्यावर नाडी थांबते.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे - हृदयविकाराच्या झटक्याची काही विशेष लक्षणे आहेत जसे की, छातीत दुखणे, दाब, जडपणा, घट्टपणा जाणवणे. ही वेदना सतत येत जात राहते. परंतु, कधी-कधी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. हृदयविकाराची सर्व लक्षणे सारखी नसतात. ही लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात. छातीत दुखणे किंवा अस्वस्थता सहसा मध्यभागी किंवा डाव्या बाजूला उद्भवते. वेदना शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकते. ही वेदना एक किंवा दोन्ही हात, मान, जबडा किंवा पाठीच्या वरच्या भागातही जाणवते. याशिवाय थंडी वाजून येणे, जास्त घाम येणे, दम लागणे, उलट्या होणे, खूप थकवा येणे आणि चक्कर येणे ही देखील हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

छातीत जळजळ म्हणजे काय - छातीत जळजळ हा आजार नसून एक लक्षण आहे. ही एक प्रकारची जळजळ आहे जी अ‌ॅसिड रिफ्लक्समुळे होते. यामुळे अन्न पुन्हा अन्ननलिकेमध्ये येते. छातीत होणारी जळजळ ही कोणत्याही प्रकारे हृदयाशी संबंधित नसते. छातीत दुखण्यामुळे लोक सहसा गोंधळतात. छातीत जळजळ झाल्यामुळे शरीराचे कोणतेही मोठे नुकसान होत नसते. परंतु, लोकांना वेदना का होतात याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नसते. तज्ज्ञांच्या मते, अॅसिड संवेदनशील नसलेल्या नसांमुळे वेदना जाणवू शकतात.

हे वाचा - Kidney Stone : मुतखड्याच्या त्रासावर हा घरगुती उपाय आहे फायदेशीर, जाणून घ्या योग्य पद्धत

छातीत जळजळ होण्याची लक्षणे - छातीत जळजळ होताना शरीराच्या अन्ननलिकेमध्ये जळजळ होते. ही जळजळ सहसा पोटाच्या अगदी वर असते. हे आम्ल तोंडाच्या वरच्या भागापर्यंत अगदी तोंडाच्या मागच्या भागातही पोहोचू शकते. याशिवाय मळमळ, सूज येणे आणि आंबट ढेकर येणे ही देखील त्याची लक्षणे आहेत. काही चाचण्यांद्वारे हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ या लक्षणांमधील फरक ओळखला जाऊ शकतो.

छातीत जळजळ आणि हृदयविकाराचा झटका यातील फरक - छातीत जळजळ होणे हे सहसा अन्न खाल्ल्यानंतर आणि झोपल्यानंतर जाणवते परंतु हृदयविकाराचा झटका देखील अन्न खाल्ल्यानंतर लगेच येऊ शकतो. आम्ल-कमी करणार्‍या औषधांनी छातीत जळजळ कमी केली जाऊ शकते. छातीत जळजळ होत असताना श्वास घेण्यास कोणताही त्रास होत नसतो. तर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये पोट फुगणे किंवा ढेकर येणे यासारखी लक्षणे दिसत नाहीत.

हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा - अमेरिकेच्या सीडीसीनुसार, काही विशेष लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. जसे की छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, दाब, जडपणा, शरीराच्या इतर भागात वेदना, श्वासोच्छवास घेण्यास त्रास, थंडी वाजून घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे, खूप थकल्यासारखे वाटणे, घशात अडकल्यासारखे वाटणे आणि शौचातून रक्तस्त्राव जाणे, ही लक्षणे हृदयविकाराची असू शकतात.

First published:

Tags: Heart Attack, Tips for heart attack