मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pesticide: कीटकनाशके वापरलेले अन्न खाणे यासाठी आहे घातक; आरोग्यावर होतात असे परिणाम

Pesticide: कीटकनाशके वापरलेले अन्न खाणे यासाठी आहे घातक; आरोग्यावर होतात असे परिणाम

Pesticide Promotes Obesity : कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले आहे की, क्लोरपायरीफॉस हे सर्वसाधारणपणे वापरले जाणारे कीटकनाशक लठ्ठपणाच्या संकटाचे प्रमुख कारण असू शकते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : वजन वाढणे, लठ्ठपणा किंवा चरबीयुक्त शरीर यासाठी सामान्यतः खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, व्यायाम न करणे, धूम्रपान, मद्यपान करणे इ. गोष्टी जबाबदार मानल्या जातात. पण, तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, या कारणांव्यतिरिक्तही एक महत्त्वाचे कारण आहे. कॅनडाच्या विद्यापीठामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार लठ्ठपणा वाढण्याचे कारण कीटकनाशके देखील (Pesticide Promotes Obesity) असू शकतात.

वास्तविक, आपण जे अन्न खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्प्यातून येते. शेतापासून ते दुकानापर्यंत ते खराब होऊ नये, कीटकांपासून त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी ते सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. म्हणून धान्यांवर कीटकनाशकांचा भरपूर वापर केला जातो. जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आपल्या शरीरावर कीटकनाशकांच्या होणाऱ्या परिणामांविषयी सतत सतर्क करत असतात.

कीटकनाशकांच्या दुष्परिणामांच्या चिंतेमध्ये आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अमर उजालामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले आहे की, क्लोरपायरीफॉस हे सर्वसाधारणपणे वापरले जाणारे कीटकनाशक लठ्ठपणाच्या संकटाचे प्रमुख कारण असू शकते.

हेे वाचा - Kitchen Tips : हे पदार्थ फ्रीजरमध्ये ठेवू नयेत; आरोग्यवर होऊ शकतात उलटे परिणाम

कीटकनाशकांमुळे लठ्ठपणा येतो

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की, कॅनडामध्ये बंदी असलेल्या क्लोरपायरीफॉसची जगभरातील भाज्या आणि फळांवर फवारणी केली जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की ते उंदरांच्या तपकिरी चरबीच्या ऊतींमधील कॅलरी जाळण्याची प्रक्रिया कमी करते. कमी कॅलरी वापरल्यामुळे थर्मोजेनेसिसची प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होऊ लागतात आणि त्यामुळे लठ्ठपणा येतो. तपकिरी फॅट पेशींवर वापरल्या जाणार्‍या 34 कीटकनाशकांच्या अभ्यासाच्या आधारे हा शोध लागला आहे.

तपकिरी चरबी आपल्या शरीरात चयापचय भट्टीसारखे कार्य करते, जे सामान्य चरबीच्या विपरीत कॅलरी बर्न करते. यातून निर्माण होणारी उष्णता आपल्या शरीरात सामान्य पांढर्‍या चरबीच्या रूपात कॅलरीज जमा होण्यापासून रोखते.

हे वाचा - Health News : प्लास्टिकमुळे गंभीर हृदयविकार होऊ शकतात, नवीन संशोधनातील माहिती

कमी कॅलरी वापरणे

बहुतेक अभ्यासांमध्ये, वजन वाढण्यासाठी जास्त खाणे जबाबदार मानले गेले आहे. तर, खरी समस्या कमी कॅलरी वापरण्याची आहे. या अभ्यासाची मानवांवर चाचणी केली गेली नसली तरी, कीटकनाशके मुक्त असलेले अन्न शक्य तितके खाणे गरजेचे आहे.

First published:

Tags: Health, Health Tips