मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Kidney Stone: या लक्षणांवरून समजेल तुम्हाला मुतखडा आहे का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

Kidney Stone: या लक्षणांवरून समजेल तुम्हाला मुतखडा आहे का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

Kidney

Kidney

तंदुरुस्त राहण्यासाठी सकस आहार आणि पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे मूत्रपिंडाची समस्या असेल तर, त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : मूत्रपिंड हा आपल्या सर्वांच्या शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. मूत्रपिंडाची शरीरात अनेक महत्त्वाची कार्यं असतात. मूत्रपिंडाद्वारे शरीरातून मूत्र तयार होऊन बाहेर पडते. ती तंदुरुस्त राहण्यासाठी सकस आहार आणि पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे मूत्रपिंडाची समस्या असेल तर, त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतो. मूत्रपिंडांना जंतुसंसर्ग (kidney infection), मूत्रपिंडाचा कर्करोग (Kidney cancer), मूत्रपिंड निकामी होणं (kidney failure) याशिवाय मुतखड्यासारख्या (kidney stone) समस्यांमुळे लोक आजकाल त्रस्त झालेले (Home Remedies for Kidney Stone) दिसतात.

'टीव्ही 9' ने दिलेल्या बातमीनुसार जेव्हा शरीरात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा सोडियम आणि इतर खनिजं एकमेकांच्या संपर्कात येतात. यामुळं मुतखडा तयार होतो. सध्या मुतखड्याची समस्या झपाट्यानं पसरताना दिसत आहे. मात्र, काही वेळा हा खडा इतका लहान असतो की, तो लवकर सापडत नाही. मुतखड्याचं दुखणं खूप असह्य असतं, हे सर्वांना माहीत आहे.

तुमच्यामध्ये ही लक्षणे दिसली तर तुम्ही उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. तातडीनं औषधोपचार घ्यावेत. शिवाय, मुतखड्याच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहू शकता.

मुतखड्याची लक्षणं (Symptoms of Kidney Stone)

तुम्हाला मुतखडा झाला असल्यास, तुमच्या ओटीपोटात आणि पाठीत तीव्र वेदना होऊ शकतात.

पुन्हा-पुन्हा उलट्या होतात किंवा मळमळण्याची समस्या होते.

लघवी करताना रक्त येऊ शकतं.

लघवीच्या संसर्गामुळं लघवीमध्ये तीव्र जळजळ होऊ शकते.

ताप येऊ शकतो

अचानक तुम्हाला घाम येणं सुरू होईल.

भूक मंदावते.

मुतखड्याच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी उपाय (Remedies for Kidney Stone Pain)

तुम्हाला मुतखडा असेल तर, तुम्हाला कधीही वेदना होऊ शकतात. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवावी लागेल. तसंच, मुतखडा होऊच नये म्हणून प्रौढ व्यक्तींनी दिवसभरात साडेतीन ते चार लिटर पाणी प्यावं. शिवाय, इतर द्रव पदार्थांचं योग्य प्रमाणात सेवन करावं. सोडियमचं आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केलं पाहिजे. शक्यतो अन्नात वरून मीठ घेऊन खाऊ नये. जास्त बिया असलेल्या फळं आणि भाज्यांचं सेवन टाळावं.

हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल

तुळशीच्या सेवनानं मुतखड्यामुळं होणारा त्रास कमी होतो. तुळशीच्या पानांचे नियमित सेवन करा. यामुळं अनेक शारीरिक समस्या दूर ठेवता येतात. आपण त्याचा काढा बनवूनही पिऊ शकता. तुळशीमध्ये व्हिटॅमिन बी असतं, त्यामुळे खड्यांच्या समस्येपासून सुटका मिळते.

पत्थरचट्टा ही एक वनस्पती आहे. ही चवीला थोडीशी खारट आणि आंबट लागते. मुतखड्यावर उपाय म्हणून त्याची पानं खाऊ शकता. ती रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत चघळल्यास मुतखडा विरघळून शरीरातून बाहेर पडू शकतो.

हे वाचा - Omicronचा मुकाबला करण्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या; ‘WHO’च्या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

कांदा कच्चा खा. त्याचा रस 1-2 चमचे प्या. याशिवाय, द्राक्षांमध्ये पोटॅशियम, पाणी जास्त असतं. सोडियम क्लोराईड खूप कमी असतं, गुसबेरी खाल्ल्यानंही मुतखडा तयार होत नाही.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips