नवी दिल्ली, 24 जानेवारी : तुम्हीही तुमच्या मोबाइलमधील डेटाबाबत चिंतीत आहात? मोबाइल अॅप्स
(Mobile Apps) आणि वेबसाइट्स
(Websites) तुमच्या डेटाचा कसा वापर करतात याबाबत तुम्हालाही काळजी वाटत असल्यास तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही प्रायव्हसी प्रोटेक्शन टूल्सच्या
(Privacy-Protection Tools) मदतीने ही भीती काही प्रमाणात नक्कीच कमी करू शकता.
ज्यावेळी तुम्ही वेब ट्रॅकर्स आणि लोकेशन इनफॉर्मेशन ब्लॉक करतात, त्यावेळी फ्री अॅप्स दुसऱ्या प्रकारे काम करू लागतात. परंतु तुम्ही काही इतर प्रकारांनी मदत मिळवू शकता.
लोकेशन -
ड्रायव्हिंगवेळी फोनची लोकेशन सर्विस अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. परंतु iOS आणि Android तुम्हाला अधिक प्रायव्हसी पाहता अशी सुविधा देतात, की तुम्ही केवळ तेच लोकेशन शेअर करू शकता, जे तुम्हाला करायचं आहे.
अॅप्स अँड अॅड्स (Apps and Adds) -
ज्यावेळी कोणतं अॅप तुमची ऑनलाइन अॅक्टिविटी मॉनिटर करत असतं, त्यावेळई iOS 15 मध्ये अॅपलचं अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपेरेन्सी फीचर याबाबत माहिती देतं. त्याशिवाय अॅप अॅडव्हरटायजिंगमध्ये अॅड्स ऑफदेखील करता येतात.
त्याशिवाय जे अॅप्स तुम्ही सध्या वापरत नाहीत, अँड्रॉइड आपोआप त्या अॅप्ससाठी परमिशन ऑफ करतं. सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनअंतर्गत हे अॅक्सेस करता येतं.
वेब -
सफारीचं प्रायव्हेट ब्राउजिंग आणि गुगल क्रोमचं इनकॉग्निटो मोड तुमच्या सर्फिंग सेशनला स्टोर करत नाही. पण हे ब्राउजर ट्रॅकरविरोधात इतकंही परिणामकारक नाही. अॅपलचं सफारी ब्राउजर अशाप्रकारचं ट्रॅकिंग ब्लॉक करण्याचं टूल देतं, जे सेटिंगमध्ये सफारी-प्रायव्हसी अँड सिक्योरिटीअंतर्गत मिळतं.
मेल (Gmail) -
काही मेसेजमध्ये अॅडव्हरटायजर्स ट्रॅकिंगपिक्सलचा वापर करतात. हा एक लहानसा फोटो असतो, जो लपलेला असतो. ज्यावेळी युजर मेसेज ओपन करतो, त्यावेळी हा फोटो मेल पाठवणाऱ्याला रिपोर्ट करतो. iOS 15 मध्ये मेल ट्रॅकर ब्लॉक करण्यासाठी टूल आहे, जो सेटिंगमध्ये मेल सेक्शनमध्ये इनेबल करता येतो.
अँड्रॉइड किंवा iOS वर जीमेल अॅपमध्ये तुम्ही फोटो ऑटोमेटेकली लोड होण्यापासून थांबवू शकता. सेटिंगमध्ये तुमच्या अकाउंट नेमवर क्लिक करा. त्यानंतर इमेजसमध्ये Ask before displaying external images पर्याय निवडू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.