मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या केवळ एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या केवळ एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

आधार कार्डधारकांना आधार संबंधित अनेक तक्रारी असतात. त्या सोडवण्यासाठी तुम्ही 1947 नंबर डायल करुन तुमच्या समस्या सोडवू शकता. UIDAI ने ट्विट करत या नंबरबाबत माहिती दिली आहे.

आधार कार्डधारकांना आधार संबंधित अनेक तक्रारी असतात. त्या सोडवण्यासाठी तुम्ही 1947 नंबर डायल करुन तुमच्या समस्या सोडवू शकता. UIDAI ने ट्विट करत या नंबरबाबत माहिती दिली आहे.

आधार कार्डधारकांना आधार संबंधित अनेक तक्रारी असतात. त्या सोडवण्यासाठी तुम्ही 1947 नंबर डायल करुन तुमच्या समस्या सोडवू शकता. UIDAI ने ट्विट करत या नंबरबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, 22 जानेवारी : जर तुम्हाला आधार कार्डशी (Aadhaar Card) संबंधित कोणतीही समस्या असेल, तर केवळ एका नंबरद्वारे (Aadhaar Card Number) दूर करू शकता. आधार कार्डधारकांना आधार संबंधित अनेक तक्रारी असतात. त्या सोडवण्यासाठी तुम्ही 1947 नंबर डायल करुन तुमच्या समस्या सोडवू शकता. UIDAI ने ट्विट करत या नंबरबाबत माहिती दिली आहे. हा नंबर 12 भाषांमध्ये तुमची मदत करू शकतो.

UIDAI ने ट्विट करुन आता आधारशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर दूर होणार असल्याचं सांगितलं आहे. आधार हेल्पलाइन (Aadhaar Helpline) 1947 नंबर 12 भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिल, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दूमध्ये उपलब्ध आहे. #Dial1947ForAadhaar आपल्या भाषेत बोलू शकता.

हे वाचा - तुमचं Gmail Account हॅक तर नाही झालं? सोप्या स्टेप्सने असं तपासा, राहाल अलर्ट

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI कडून हा नंबर जारी करण्यात आला आहे. हा हेल्पलाइन नंबर 1947 मोफत आहे. या क्रमांकावर संपूर्ण वर्षभर आयवीआरएस मोडवर 24 तास सुविधा उपलब्ध असते. या सुविधेसाठी कॉल सेंटर प्रतिनिधी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार उपलब्ध असतात. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असतात.

बाजारात तयार केलेलं PVC Aadhaar Card अमान्य, घरबसल्या असं करा UIDAI वरुन ऑनलाइन ऑर्डर

हा आधार हेल्पलाइन नंबर लोकांना आधार नोंदणी केंद्र, नोंदणी केल्यानंतर आधार नंबरची स्थिती आणि आधारसंबंधी इतर माहिती देतो. त्याशिवाय आधार कार्ड हरवलं असल्यास किंवा पोस्टातून अद्याप मिळालं नसल्यासही या क्रमांकावर माहिती मिळवता येते.

असं तयार करा PVC Aadhaar Card -

- UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा.

- इथे ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये ‘Order Aadhaar PVC Card’वर क्लिक करा.

- त्यानंतर 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी (EID) टाका.

- आता सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.

- आता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाका.

- आता आधार पीव्हीसी कार्डचा एक प्रीव्ह्यू दिसेल.

- त्यानंतर खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.

- पेमेंट पेजवर 50 रुपये फी जमा करावी लागेल.

- पेमेंट पूर्ण झाल्यानंतर Aadhaar PVC Card साठी ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card on phone, Tech news