नवी दिल्ली, 4 जून : आजकाल मोबाईलशिवाय (Mobile) राहण्याचा कोणी विचारदेखील करू शकत नाही. मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. पूर्वीचे साधे हँड्सेट इतिहासजमा होऊन आता अत्याधुनिक स्मार्टफोन (Smartphone) आले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश असलेले स्मार्टफोन बाजारात दाखल होत असतात. स्मार्टफोन उत्पादन करणाऱ्या कंपन्या सतत नवीन तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना अधिक प्रगत स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न करत असतात.
कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये जे पॉवरफुल प्रोसेसर (Processor) आणि रॅम (RAM) वापरलं जातं त्याचा उपयोग स्मार्टफोनमध्ये केला जातो. त्यामुळे स्मार्टफोन्स अधिक गतीने काम करतात. आजकाल येणारे स्मार्टफोन्स अतिशय फास्ट आणि कार्यक्षम आहेत. तरीही अनेक लोक फोन स्लो (Slow) झाल्याची किंवा फोन वारंवार हँग (Hang) होत असल्याची तक्रार करताना आढळतात. तुमच्या फोनबाबतही अशी अडचण येत असेल तर, त्यावर हा सोपा उपाय फायदेशीर ठरेल.
फोन रीस्टार्ट करा -
आपला फोन आधी कधी रीस्टार्ट (Restart) केला होता ते लक्षात ठेवा. वास्तविक, सतत सुरू राहिल्यामुळे, अँड्रॉईड सिस्टम मोबाईलच्या प्रत्येक प्रक्रियेची तात्पुरती फाईल तयार करत राहते. याशिवाय आपल्या फोनची फिजिकल मेमरी जिला आपण रॅम (Ram) म्हणून ओळखतो, त्या मेमरीचा एक मोठा हिस्सा सतत वापरल्यामुळे व्यापला जातो. त्यामुळे आपला फोन स्लो होतो किंवा हँग होत राहतो. म्हणूनच ठराविक काळानंतर आपला फोन रीस्टार्ट करा, जेणेकरून तात्पुरत्या फाइल्स डिलीट होतील आणि फिजिकल मेमरीही विनाकारण व्यापलेली जागा मोकळी होईल.
अपडेट्सदेखील महत्वाचे -
आपल्या स्मार्टफोनवर येणारे अपडेट्स (Updates) वेळोवेळी पूर्ण करा. कारण यामध्ये काहीवेळा बग पॅचेस (Bug Patches) असतात, जे स्मार्टफोनमधील कोणताही चुकीचा प्रोग्राम दुरुस्त करतात. तसंच नवीन वैशिष्ट्यंदेखील उपलब्ध करतात.
इंटर्नल स्टोअरेजकडं लक्ष द्या -
आपल्या फोनचं इंटर्नल स्टोअरेज कधीही दोन तृतीयांशपेक्षा अधिक भरु देऊ नका. असे अनेक अॅप्स (Apps) असतात जे आपल्या फोनमध्ये विनाकारण असतात. अनेकदा ते बॅकग्राउंडवर सुरू राहतात, त्यामुळे आपल्या फोनच्या नॉर्मल स्टोअरेज आणि इंटर्नल स्टोअरेजवर (internal Storage) परिणाम होतो. त्यामुळे असे निरुपयोगी अॅप्स काढून टाका आणि कधीही इंटर्नल स्टोअरेज दोन तृतीयांशपेक्षा अधिक भरणार नाही याची काळजी घ्या. यासाठी दर महिन्यानंतर स्टोरेज तपासत राहावं आणि निरुपयोगी फाईल्स डिलीट कराव्यात.
फॅक्टरी रिसेटचा पर्याय -
वरीलपैकी कोणत्याही उपायाने आपल्या फोनचा स्पीड वाढत नसेल, तर फोन फॅक्टरी रिसेट (Factory Reset) करण्याचाही एक पर्याय असतो. मात्र ते करण्यापूर्वी काही बाबींची दक्षता घ्यावी लागते. ती काळजी घेत डेटा बॅकअप घेतल्यानंतरच फोन रिसेट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Phone battery, Smartphone, Tech news