Cache Memory - Cache मध्ये अनेक गोष्टी सेव्ह असल्याने काही दिवसांतच स्टोरेज फुल होतं. Apps आणि Website लोडिंग टाईम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा Cache होतो. त्यामुळे Cache Memory डिलीट करा. यामुळे मोठी स्पेस फ्री होईल.
Downloads फाईल्स - मेलवरुन फोनवर अनेक फाईल्स डाउनलोड केल्या जातात. डाउनलोड केल्यानंतर या फाईल्स सेव्ह केल्याचं विसरलं जातं. त्यामुळे फोनच्या डाउनलोडमध्ये जाऊन नको असलेल्या फाईल्स डिलीट करा. यामुळे फ्री स्पेस मिळेल.
क्लिनिंग App - फोनची मेमरी वाढवण्यासाठी युजर्स अनेकदा क्लिनिंग Apps चा वापर करतात. या Apps ऐवजी गुगल फाईल्स App (Files by Google) चा वापर करा. हे क्लिनिंग App चंही काम करतं. हेदेखील स्टोरेज क्षमता चांगली करण्यासाठी मदत करतात.
WhatsApp Video - दररोज WhatsApp किंवा इतर ठिकाणाहून अनेक व्हिडीओ फोनवर येत असतात. हे व्हिडीओ कामाचेही नसतात. असे व्हिडीओ हटवल्यानेही फोन स्टोरेज कॅपेसिटी चांगली होते.
वापरात नसलेले Apps - वापरात नसलेले App डिलीट करणं, स्टोरेज नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात परिणामकारक ठरतं. यामुळे फोन Storage वाढवण्यास मदत होते.