नवी दिल्ली, 2 जून: देशात कोरोना व्हायरसमुळे स्मार्टफोनचा (Smartphone) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत स्मार्टफोनच्या वापराने फोन हँग होणं सामान्य बाब आहे. फोन हँक होत असल्याने अनेक युजर्स फोन Factory Reset करणंचं सर्वात योग्य पर्याय समजतात. परंतु फॅक्टरी रिसेटमध्ये फोनचा सर्व डेटा डिलीट होतो, त्यामुळे युजर्सनी फोन फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा नुकसानीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
Factory Reset म्हणजे काय?
फॅक्टरी रिसेट म्हणजे, तुमचा फोन इंटरनली अगदी तसाच होईल, जसा तो फॅक्टरीमधून तुमच्या शहरात येताना होता. या रिसेट पद्धतीत तुमच्या फोनचा संपूर्ण डेटा फोटो, अॅप्स, पासवर्ड्स आणि इतर डेटा डिलीट होईल.
रिसेट करण्यापूर्वी काय कराल?
ज्यावेळी फोन फॅक्टरी रिसेट कराल, त्याआधी फोनमधील महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे. स्मार्टफोनमधून आपल्या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी मेमरी कार्ड, क्लाउड सर्विस किंवा फोन लॅपटॉपशी कनेक्ट करुन तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेऊ शकता.
Factory Reset केल्याने तुमच्या फोनच्या इंटरनल स्टोरेजवर चुकीचा प्रभाव पडतो. त्यामुळे जेव्हा अगदी गरज असेल, त्याचवेळी फॅक्टरी रिसेट करा. अन्यथा फोन सामान्य हँग झाल्यास, बॅकग्राउंडमध्ये रन होणारे, विना वापरातले अॅप्स डिलीट करू शकता.
रिसेट -
प्रत्येक स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम वेगवेगळी असते. त्यामुळे फोन कधीही कोणत्याही प्रकारे रिसेट करू नका. फोन फॅक्टरी रिसेट करण्यासाठी सर्वात आधी फोनच्या Settings मध्ये जा, त्यानंतर बॅकअप किंवा प्रायव्हसी अँड रिसेट ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर त्याखाली येणाऱ्या फॅक्टरी ऑप्शनवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile Phone, Smartphone, Tech news