नवी दिल्ली, 14 जानेवारी : सॅमसंगची (Samsung) Galaxy S21 सीरीज आज भारतात लाँच होणार आहे. या सीरीजमधील Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोनला 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे साउथ कोरियन कंपनी सॅमसंग यावर्षी नवा इनोव्हेटिव्ह कॅमेरा सेन्सर लाँच करणार असल्याची माहिती लीकस्टर Ice Universe ने दिली आहे.
सॅमसंग हा नवा स्मार्टफोन कंपनीच्या ISOCELL ब्रँडअंतर्गत लाँच करणार असल्याची माहिती आहे. Samsung चा नवा फोन तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाणार आहे. या सेन्सरशिवाय आणखीही कॅमेरा सेन्सर कंपनी यासोबत लाँच करणार आहे.
यापूर्वी मार्च 2020 मध्ये कंपनी 150 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर लाँच करणार असल्याची चर्चा होती. मात्र सॅमसंगने असा कोणताही 150 मेगापिक्सल सेन्सर लाँच केलेला नाही.
कोणत्याही स्मार्टफोनचा कॅमेरा परफॉर्मेन्स केवळ मेगापिक्सलवर अवलंबून नसतो. यात सॉफ्टवेअर ऑप्टिमायजेशन आणि मशीन लर्निंगचाही महत्त्वाचा भाग असतो. तसंच हार्टवेअरही महत्त्वाचा असतो. अधिक मेगापिक्सल असणाऱ्या सेन्सर स्मार्टफोनला वाईड डिग्री, कलर करेक्शन आणि चांगली क्वालिटी ऑफर करू शकते.
Samsung ISOCELL will launch many innovative sensors in 2021.
200MP is coming soon.
— Ice universe (@UniverseIce) January 9, 2021
दरम्यान, सॅमसंगने या 200 मेगापिक्सल सेन्सर कॅमेरा स्मार्टफोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. सॅमसंगच्या या हायर मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरची माहिती लीक्सवर आधारित आहे.
सॅमसंग (Samsung) आज गॅलेक्सी अनपॅक्ड 2021 (Galaxy Unpacked 2021) इव्हेंट भारतात संध्याकाळी 8 वाजता होस्ट करणार आहे. या इव्हेंटमध्ये Galaxy S21 सीरीज लाँच केली जाणार आहे. या व्हर्च्युअल इव्हेंटचं स्ट्रीमिंग सॅमसंगच्या सोशल मीडिया हँडल्स आणि यूट्यूबद्वारे केलं जाणार आहे. S21 सीरीज अंतर्गत Galaxy S21, Galaxy S21, आणि Galaxy S21 Ultra हे फोन आज लाँच केले जाऊ शकतात.