नवी दिल्ली, 14 जानेवारी : सॅमसंग (Samsung) आज गॅलेक्सी अनपॅक्ड 2021 (Galaxy Unpacked 2021) इव्हेंट होस्ट करणार आहे. या इव्हेंटमध्ये Galaxy S21 सीरीज लाँच केली जाणार आहे. या व्हर्च्युअल इव्हेंटचं स्ट्रीमिंग सॅमसंगच्या सोशल मीडिया हँडल्स आणि यूट्यूबद्वारे केलं जाणार आहे. S21 सीरीज अंतर्गत Galaxy S21, Galaxy S21, आणि Galaxy S21 Ultra हे फोन आज लाँच केले जाऊ शकतात.
त्याशिवाय कंपनी Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Buds Pro आणि Galaxy SmartTag Bluetooth लाँच करू शकते. सॅमसंग Galaxy Unpacked 2021 इव्हेंट भारतीय ग्राहकांसाठी संध्याकाळी 8 वाजता होस्ट करेल. यात इंडिया स्पेसिफिक अनाउंसमेंट्स पाहायला मिळतील.
Samsung Galaxy S21 सीरीजची भारतीय किंमत अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु काही रिपोर्ट्सनुसार, Galaxy S21 ची सुरुवातीची किंमत जवळपास 75,600 रुपये असू शकते. Galaxy S21 ची किंमत 93,400 रुपये, तर Galaxy S21 Ultra या स्मार्टफोनची किंमत 1,24,600 असण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S21 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि Exynos 2100 प्रोसेसर असू शकतो. Galaxy S21ला 4000mAh बॅटरी, Galaxy S21ला 4800maAh, तर Galaxy S21 Ultra मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असू शकते.
फोटोसाठी Galaxy S21आणि Galaxy S21 मध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. तर Galaxy S21 Ultra मध्ये 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असू शकतो. Galaxy S21 Ultra मध्ये S पेन दिला जाण्याचीही शक्यता आहे.