मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /चुकूनही Google वर Search करू नका 'या' 10 गोष्टी; होऊ शकतं नुकसान

चुकूनही Google वर Search करू नका 'या' 10 गोष्टी; होऊ शकतं नुकसान

आपल्याला गुगल जी माहिती देतो, तो कंटेंट गुगल स्वत: बनवत नाही, तर हा केवळ एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युजर्सच्या सर्चच्या आधारे वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या लिंक दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जे काही गुगलवर सर्च करता ते सर्वच योग्य आणि अचूक असेलच असं नाही.

आपल्याला गुगल जी माहिती देतो, तो कंटेंट गुगल स्वत: बनवत नाही, तर हा केवळ एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युजर्सच्या सर्चच्या आधारे वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या लिंक दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जे काही गुगलवर सर्च करता ते सर्वच योग्य आणि अचूक असेलच असं नाही.

आपल्याला गुगल जी माहिती देतो, तो कंटेंट गुगल स्वत: बनवत नाही, तर हा केवळ एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युजर्सच्या सर्चच्या आधारे वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या लिंक दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जे काही गुगलवर सर्च करता ते सर्वच योग्य आणि अचूक असेलच असं नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 9 जानेवारी : कोणत्याही गोष्टीची माहिती करुन घेण्यासाठी सर्वच जण गुगलचा (Google) वापर करतात. सर्वांनाच ही सवय आहे की, काहीही सर्च करण्यासाठी गुगल ओपन (google search) केलं जातं. पण आपल्याला गुगल जी माहिती देतो, तो कंटेंट गुगल स्वत: बनवत नाही, तर हा केवळ एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. युजर्सच्या सर्चच्या आधारे वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या लिंक दाखवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जे काही गुगलवर सर्च करता ते सर्वच योग्य आणि अचूक असेलच असं नाही. सर्वच माहिती गुगलवरून सर्च करुन घेत असाल, तर काही गोष्टी चुकूनही गुगलवर सर्च करू नका.

बँक ऑनलाईन वेबसाईट -

बँकेची ऑनलाईन बँकिंग वेबसाईट गुगलवर सर्च करू नका. ऑफिशियल वेबसाईटऐवजी, बँकेचा लॉगइन पासवर्ड एखाद्या फेक वेबसाईटवर चुकून टाकला जाऊ शकतो. ज्यामुळे हॅकर्स तुमच्या डिटेल्सचा चुकीचा फायदा घेऊ शकतात.

कोणत्याही कंपनीचा customer care नंबर सर्च करू नका -

फसवणूक करणारे खोटा कस्टमर केअर नंबर बनवून युजर्सची फसवणूक करू शकतात. गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च करताना अनेकदा स्कॅम होतात.

(वाचा - customer care scam : फोनमध्ये हे 7 App डाउनलोड करू नका; खाली होऊ शकतं बँक अकाउंट)

apps आणि सॉफ्टवेअर डाउनलोड -

मोबाईल apps डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल app store किंवा google play store चा वापर करा. गुगलवर apps आणि सॉफ्टवेअर सर्च करताना मालवेअरचा धोका निर्माण होतो.

औषध किंवा आजाराची लक्षणं -

आजारी असताना डॉक्टरशिवाय, गुगलवर इलाजासाठी सर्च करू नका. कधीही गुगलवर आजाराशी संबंधित मिळालेल्या माहितीच्या आधारे औषधं खरेदी करू नका.

पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केट सल्ला -

गुगलवर कधीही पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केटबाबतचा सल्ला घेऊ नका. यासाठी गुगल सर्चवर कोणताही ऑथेंटिक सोर्स मिळत नाही. तसंच कोणताही व्यवहार गुगलवर मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्यास फसवणूक होण्याचा धोका वाढतो.

(वाचा - Whatsapp Update! या अटी मान्य न केल्यास Delete करावं लागेल अकाउंट)

सरकारी वेबसाईट -

फ्रॉड करणारे बँकिंग, म्युनिसिपॅलिटी किंवा रुग्णालय अशा सरकारी वेबसाईटला निशाणा करतात. अशावेळी ओरिजनल वेबसाईट ओळखणंही अनेकदा कठिण होतं. त्यामुळे कोणतीही माहिती सर्च करताना सावधगिरी बाळगा.

सोशल मीडिया लॉगइन पेज -

सोशल मीडिया एक्सेस करताना नेहमी त्याचा डायरेक्ट URL टाईप करा. गुगलवर कोणत्याही सोशल मीडियाचं login पेज सर्च करताना फसवणूक होण्याची शक्यता असते.

ई-कॉमर्स वेबसाईट ऑफर्स -

गुगलवर e-commerce वेबसाईटच्या ऑफर्सबाबत अनेक फेक पेज असतात, त्यापासून सावध राहा. फ्रॉड करणारे अनेकदा मॅलिशियस, खोट्या वेबसाईटवरून युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरी करतात.

(वाचा - WhatsAppच्या नव्या अटींमुळे युजर्स दुसऱ्या पर्यायाच्या शोधात; या App ला पसंती)

फ्री अँटी व्हायरस -

गुगलवर अँटी व्हायरस apps आणि सॉफ्टवेअर सर्च करू नका. यात ओरिजनल apps ची ओळख होणं कठिण होतं. त्यानुळे चुकून खोट्या फ्री अँटी व्हायरसवर क्लिक केल्यास डिव्हाईसमध्ये व्हायरस येण्याचा धोका वाढतो.

कूपन कोड -

शॉपिंगवेळी कूपन कोड मिळाल्यास ठीक आहे. परंतु गुगलवर कूपन कोड सर्च करू नका. कारण फेक वेबसाईट स्वस्तात कूपन विकून फसवणूक करू शकतात. यामुळे युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरी होण्याचा धोका वाढतो.

First published:
top videos

    Tags: Google