जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone मध्ये दिसणाऱ्या या लहानशा होलची असते मोठी भूमिका, वाचा काय आहे याचा फायदा

Smartphone मध्ये दिसणाऱ्या या लहानशा होलची असते मोठी भूमिका, वाचा काय आहे याचा फायदा

Smartphone मध्ये दिसणाऱ्या या लहानशा होलची असते मोठी भूमिका, वाचा काय आहे याचा फायदा

फोनच्या सर्वात खाली चार्जिंग होलच्या जवळ एक अगदी लहानसा होलही असतो. अनेकांना हा होल नेमका कसला आहे याबाबत माहिती नसते. या होलची स्मार्टफोन वापरात मोठी भूमिका आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 जानेवारी : आजकाल जवळपास सर्वांकडेच Smartphone असतो. विविध डिझाइन, फीचर्ससह अनेक प्रकारचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. फोनला असलेल्या वॉल्यूम बटण, लॉक बटण, माइक, स्पीकर अशा गोष्टींबद्दलची माहिती अनेकांना असते. परंतु फोनच्या सर्वात खाली चार्जिंग होलच्या जवळ एक अगदी लहानसा होलही असतो. अनेकांना हा होल नेमका कसला आहे याबाबत माहिती नसते. या होलची स्मार्टफोन वापरात मोठी भूमिका आहे. हा अतिशय लहानसा होल चार्जिंग किंवा गाण्यांसाठी नसतो. हा होल नॉइज कॅन्सेलेशनसाठी असतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या कॉलवर असता, त्यावेळी हा अॅक्टिवेट होतो. हा लहानसा दिसणारा होल स्मार्टफोनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा होल जवळपासचा साउंड, हवा अशा गोष्टी कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे दुसरीकडे असलेल्या, आपल्याशी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला आवाज नीट ऐकू येतो.

मोबाईलचे लोकेशन सांगणारा IMEI नंबर म्हणजे काय? काय आहे त्याचं महत्त्व?

कसं काम करतं नॉइज कॅन्सेलेशन? फोनवर बोलताना आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे आवाज असतात. पण बाजूला मोठा आवाज असला, तरी समोरील व्यक्ती तुमचा आवाज ऐकू शकतो. यात लहानशा होलची मोठी भूमिका असते.

Google Payवर सोनं खरेदी-विक्रीची संधी, ऑनलाईन ट्रान्झेक्शनसाठी पाहा सोपी प्रोसेस

हा होल अतिशय कमी अमाउंटच्या जवळचा साउंड कॅप्चर करतो आणि बॅकग्राउंड साउंड कॅन्सल करतो. त्यामुळे बाजूच्या गोंगाटाचा आवाज या होलमुळे कॉलपर्यंत पोहोचू शकत नाही. नॉइज कॅन्सेलेशन सर्किट बाहेरील आवाज ओळखून फोनच्या बॅकग्राउंड साउंडचा मोठा भाग ब्लॉक करतो. याला साउंड कम्पेनसेशन म्हणतात. त्यामुळे अगदी मोठ्या आवाजाच्या ठिकाणीही फोनमधून ऐकू येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात