मुंबई, 18 जानेवारी: अनेक महिन्यांची उत्सुकता, विविध चर्चा, अफवांनंतर सॅमसंगनं (Samsung launched Galaxy S21 FE 5G in India) भारतात अखेर आपला Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. 2022 मध्ये लाँच करण्यात आलेला सॅमसंगचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy S20 FE या स्मार्टफोनची ही पुढची आवृत्ती किंवा व्हर्जन (Version) आहे. नेहमीच्या Galaxy S21 फोनमधला हा अगदी नवीन फोन आहे. नवीन तंत्रज्ञान आणि लूक असणारा हा Galaxy S21 FE 5G फोन वापरणं हा अद्वितीय अनुभव असेल असा दावा करण्यात येत आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED display, पॉवरफुल प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि अन्य बरीच फीचर्स असल्याचं सांगितलं जात आहे. S21 FE 5G या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 5G बँडला सपोर्ट करतो. Samsung Galaxy S21 FE 5G हा फोन काही काळ वापरल्यानंतर त्याबद्दलचा हा रिव्ह्यू- Samsung Galaxy S21 FE 5G चं डिझाईन आणि डिस्प्ले Samsung Galaxy S21 FE 5G सीरिजचं डिझाईन Galaxy S21 सीरिजमधून प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आलं आहे. यामध्ये साईड कॅमऱ्यामध्ये ब्लेंड होणारा ट्रिपल कॅमेरा आहे. याची फ्रेम ॲल्युमिनियमची आहे आणि बॅक पॅनेल प्लॅस्टिकचं आहे. याचं वजन 177 ग्रॅम्स आहे. त्यामुळे अर्थातच हा फोन वजनानं अगदी हलका आहे. तसंच Gorilla Glass Victus नं त्याला संरक्षित केलं असल्यामुळे तो टिकाऊही आहे. कॅमेरा मोड्युलचा रंग आणि बॅक पॅनेलचा रंग सारखाच ठेवल्यानं Samsung Galaxy S21 FE 5G या फोनचा लूक आणखीनच मस्त झाला आहे. हा फोन - ग्रॅफाईट, पांढरा, लवेंडर आणि ऑलिव्ह या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन मजबूत, टिकाऊ आहे आणि अगदी हाताळायला सोपा आहे. इतर फोनच्या तुलनेत या मोबाईलचे व्ह्युविंग अँगल्स उच्च दर्जाचे आहेत. तसंच त्याची कलर प्रॉडक्शन क्वालिटीही चांगली आहे. हे वाचा- Amazon Great Republic Day Sale: 10000 पेक्षा कमी किमतीत मिळतील हे 6 फोन या फोनच्या लूकबद्दल बोलायचं तर त्याला Full HD+ resolution सह 6.4 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले पॅनेल आहे. इतकंच नाही तर डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा देखील 120Hz असल्याने त्याचा अनुभवही अगदी चांगला आहे. सॅमसंगनं याही फोनमध्ये 19.5:9 हाच ॲस्पेक्ट रेशो ठेवला आहे आणि त्याची पिक्सेल डेन्सिटी प्रति इंच 411 पिक्सेल्स इतकी आहे. म्हणजे थेट सूर्यप्रकाशातही तुम्हाला फारशी अडचण येणार नाही. इतर फोनच्या तुलनेत या मोबाईलचे व्ह्युविंग अँगल्स उच्च दर्जाचे आहेत. तसंच त्याची कलर प्रॉडक्शन क्वालिटीही चांगली आहे. एकूणच, या फोनच्या डिस्प्लेमध्ये न आवडण्यासारखं काहीच नाही. गेमिंग असो किंवा फिल्म बघणं किंवा दैनंदिन वापरासाठी वापरायचा असो हा फोन वापरणं हा नक्कीच सुखद अनुभव आहे. या फोनच्या परफॉरमन्स बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत येतो. भारतात विकल्या जाणाऱ्या डिव्हाईसमध्ये सॅमसंग Qualcomm Snapdragon chipset का वापरत नाही यावर अनेकदा चर्चा होते. खरं तर सॅमसंगच्या सर्व डिव्हाईससाठी Exynos विरुद्ध Snapdragon chipset ही चर्चा नेहमीच रंगते. टेक्नॉलॉजीच्या चाहत्यांची मतं वेगवेगळी आहेत. पण सर्वसामान्य ग्राहकांसाठी या फोनचा योग्य परफॉरमन्स हेच महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं. अगदी हाच वेगळा अनुभव तुम्हाला या फोनमधून मिळतो. हे वाचा- 50MP कॅमेरासह Realme 9i बजेट Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स भारतात सॅमसंगनं 5nm Exynos 2100 chipset असलेला S21 FE 5G फोन आणला आहे. अगदी महाग असलेल्या Galaxy S21 Ultra and S21+ या फोनसह S21 सीरिजमधील अन्य फोनमध्येही हा चिपसेट वापरला आहे. या फोनमध्ये तुमच्या दैनंदिन वापराच्या गरजा पूर्ण करणारं कॉन्फिग्रेशन 8 GB RAM आहे. त्याशिवाय दोन स्टोरेज व्हेरियंट्सही (घटक) आहेत. तुम्ही 8GB of RAM असलेला S21 FE फोन घेऊ शकता किंवा 128 GB इंटर्नल स्टोरेज असलेला फोनही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर याहीपेक्षा जास्त स्टोरोजची गरज असेल तर याच 8 GB RAM मॉड्युलसह असलेला 256GB चा फोनही घेऊ शकता. या फोनमध्ये micro SD उपलब्ध नाही याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे या फोनला हेडफोन जॅकही नाही. त्यामुळे तुम्हाला संगीत ऐकायचं असेल तर त्यासाठी वायरलेस म्हणजे ब्लूटूथ होडफोन हाच पर्याय आहे. या फोनचा एकूणच परफॉरमन्स पाहिला तर फोन वापरासाठी उत्तम आणि एकाच वेळेस विविध प्रकारचे म्हणजेच मल्टीटास्किंग अनुभव देणारा आहे. गेम खेळताना किंवा एकूणच हा फोन वापरताना त्यामध्ये काही उणीव नाही हे जाणवतं किंवा ॲप क्रॅश होण्याचा अनुभवही येत नाही. हा फोन वापरणाऱ्या अनेकांचा अनुभव चांगलाच आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 12 (Android 12) ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि अगदी सॉफ्टवेअर सिस्टीमही अगदी व्यवस्थित चालत असल्याचा अनुभव आहे. हे वाचा- WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट भारतात सध्या 5G कनेक्टिव्हिटीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. Galaxy S21 FE हा फोन या कनेक्टिव्हिटिला सपोर्ट करणारा आहे ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही या फोनवर 5G परफॉरमन्सची चाचणी घेऊ शकलो नाही. फोटो, व्हिडीओबाबत म्हणाल तर चांगला प्रकाश असेल तर या फोनमधून तुम्हाला एकदम मस्त अनुभव मिळतो पण कमी प्रकाश असेल तर मात्र तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सॅमसंगनं अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. Galaxy S21 FE या फोनमध्ये 12 मेगापिक्सेल ड्युएल पिक्सेल वाईड प्रायमरी सेन्सरसह (12-megapixel dual pixel Wide primary sensor) ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्यामुळे तुम्हाला ऑटो फोकस, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि F1.8 चं ॲपेरचर उपलब्ध आहे. तर अन्य दोन कॅमेऱ्यांमध्ये F2.2 ॲपेरचरसह 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर आणि F2.4 ॲपेरचरसह 8 मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर उपलब्ध आहे. या फोनमध्ये 30 X डिजिटल झूम उपलब्ध आहे. अर्थात ही गोष्ट ऐकायला चांगली वाटत असली तरी त्यासाठी तुम्हाला चांगला परिणाम मिळण्यासाठी तुमचे हात अत्यंत स्थिर ठेवावे लागणार आहेत हे नक्की. त्याशिवाय दरवेळेस सुपर झूम केलेले फोटो चांगलेच असतील असंही नाही. या फोनमध्ये 4K रिझोल्युशननं प्रति सेकंद 60 फ्रेम्स इतके व्हिडीओ रेकॉर्ड होऊ शकतात. व्हिडिओची गुणवत्ता चांगली आहे आणि वापरणाऱ्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील असं हे फिचर आहे. एकूणच, या कॅमेऱ्यानं तुम्हाला अगदी अद्वितीय अनुभव मिळेल यात शंका नाही. पण तुम्हाला कमी प्रकाश असताना थोडंसं शांतपणे काम करावं लागेल. याच्या फ्रंट म्हणजेच समोरच्या बाजूला 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. हल्ली सोशल मीडियासाठी जास्त फोटो काढले जातात. याचं ॲपेरचर F2.2 इतकं आहे. त्यामुळे सोशल मीडियासाठी अगदी चांगले आणि डिसेंट फोटो निघतात. Samsung Galaxy S21 FE 5G ची बॅटरी तुम्ही दिवसभरात अगदी गेम वगैरे खेळलात आणि अन्य गोष्टींसाठीही हा फोन वापरला तरी या फोनची बॅटरी एक दिवस आरामात पुरते. यामध्ये 25 W फास्ट चार्जिंगसह 4,500 mAh बॅटरी आहे. तुम्ही जर फोन वायरलेस चार्ज केलात तर 15w वेगाने चार्जिंग होतं. यामध्ये रिव्हर्स चार्जिंगही उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे इअरबड्स किंवा स्मार्टवॉचेसही चार्ज करु शकता. मात्र या फोनसह तुम्हाला चार्जर मिळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर वेगानं चार्ज करणारा चार्जर नसेल तर तो तुम्हाला विकत घ्यावाच लागेल. हल्ली सॅमसंगनं त्यांच्या या अनोख्या फोनसाठी बॉक्सचा आकार बदलला आहे. त्यामुळे त्या बॉक्समध्ये तुम्हाला फक्त फोन आणि त्याची चार्जिंग वायर हेच मिळतं. हे वाचा- Amazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone या फोनच्या अन्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं तर सॅममसंग पे (Samsung Pay) साठी यामध्ये सपोर्ट आहे. तसंच Samsung Dex ला सपोर्ट आहे, ज्यामुळे तुम्ही फोन कम्युटर किंवा मॉनिटरला कनेट्क करु शकता किंवा हा फोन तुम्ही अँड्रॉईड कम्प्युटर (‘Android computer’.) म्हणूनही वापरू शकता. Samsung Galaxy S21 FE 5G हा फोन Galaxy S21 या सीरिजमधील फोनप्रमाणेच वेगळा अनुभव देणारा आहे आणि त्याशिवाय अगदी परवडणाऱ्या किंमतीत आहे. अर्थात काही फोन हे कागदावर किंवा बघायला अगदी चांगले वाटतात पण सँमसंगचा हा फोन मात्र कोणत्याही अडथळ्याविना दीर्घकाळ चालतो. सॉफ्टवेअर, टिकाऊपणा आणि ब्रँड व्हॅल्यू यामध्येही हा फोन उत्तम आहे. Samsung Galaxy S21 FE 5G फोन कोणतंही चमचमाट असलेलं फिचर, चार्जिंग किंवा कॅमेरा क्षमतेचा अवास्तव दावा करत नाही. मात्र अगदी विश्वासार्ह सेवा देणारा फोन, चांगला कॅमेरा, 5G सपोर्ट, उत्तम परफॉरमन्स आणि बॅटरी लाईफ या गोष्टी तुम्हाला यामध्ये नक्की मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.