Home /News /technology /

Amazon Great Republic Day Sale: 10000 पेक्षा कमी किमतीत मिळतील हे 5 फोन

Amazon Great Republic Day Sale: 10000 पेक्षा कमी किमतीत मिळतील हे 5 फोन

Amazon

Amazon

तुम्हाला देखील नवीन मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल’ (Amazon Great Republic Day Sale) हा अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. 17 जानेवारीपासून सुरू झालेल्या अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये मोबाईल फोनवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 18 जानेवारी: सध्याच्या 'हार्ड अँड फास्ट' युगामध्ये आज उदयाला आलेली टेक्नॉलॉजी (Technology) काही दिवसातच आउटडेटेड वाटू लागते. आपल्या हातामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी (Latest Technology) असलेला फोन असावा अशी अनेकांची इच्छा असते. या गोष्टीचा फायदा घेत अनेक स्मार्टफोन (Smartphone) कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन फोन लाँच केले आहेत. जर तुम्हाला देखील नवीन मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल’ (Amazon Great Republic Day Sale) हा अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो. 17 जानेवारीपासून सुरू झालेल्या अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये मोबाईल फोनवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. या सेलमध्ये वन प्लस (OnePulse), शाओमी (Xiaomi), सॅमसंग आयक्युओओ (Samsung iQOO) आणि अ‍ॅपलच्या (Apple) अनेक फोनवर ऑफर्स दिल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच मोबाईलबद्दल सांगणार आहोत, जे अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहेत. हे वाचा-देशातील सर्वात स्वस्त CNG Car, बाइक इतकं मिळेल मायलेज; पाहा किंमत आणि फीचर्स टेक्नोनं (Tecno) अलीकडे अ‍ॅमेझॉनवर आपले तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये टेक्नो स्पार्क 8टी (Tecno Spark 8T), टेक्नो स्पार्क 8 प्रो (Tecno Spark 8 Pro) आणि टेक्नो पॉप 5 एलईटीचा (Tecno Pop 5 LTE) समावेश आहे. टेक्नो पॉप 5 एलईटी हा एक सर्वसामान्यांना परवडणारा ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन आहे. अमेझॉनवर या फोनची किंमत सहा हजार 299 रुपयांपासून सुरू आहे. टेक्नो पॉप 5 एलईटीमध्ये 5 हजार mAh बॅटरी, IPX2 स्प्लॅश रेझिस्टन्स आणि 6.52-इंच HD प्लस डिस्प्लेसारखी फीचर्स आहेत. टेक्नो पॉपची प्रभावी किंमत 5 हजार 670 रुपयांपर्यंत घेऊन डील आणखी चांगली करण्यासाठी तुम्ही एसबीआय (SBI) क्रेडिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के झटपट सूटदेखील मिळवू शकता. टेक्नो स्पार्क 8टी (Tecno Spark 8T) अ‍ॅमेझॉनच्या रिपब्लिक डे सेलमध्ये टेक्नो स्पार्क 8टी हा फोन 9 हजार 299 रुपयांना उपलब्ध आहे. एसबीआयचे कार्ड्सवर वापरल्यास या किमतीवर अतिरिक्त 10 टक्के सूट उपलब्ध आहे. कार्ड वापरल्यास फोनची किंमत 8 हजार 370 रुपये इतकीचं होते. मेटल डिझाइन असलेल्या स्पार्क 8 टीमध्ये 6.6-इंचाचा FHD प्लस डिस्प्ले, 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हे वाचा-Alert!बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा;सर्व्हेतून धक्कादायक खुलासा,काय आहे कारण रेडमी 9ए स्पोर्ट (Redmi 9A Sport) साध्या सेलमध्ये या फोनची किंमत 8 हजार 499 रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये रेडमी 9ए स्पोर्ट फक्त 6 हजार 999 रुपयांना मिळत आहे. फोन खरेदीसाठी एसबीआय क्रेडिट वापरल्यास 10 टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे. त्यामुळं हा साडेआठ हजार रुपयांचा फोन 6 हजार 299 रुपयांना घेता येणार आहे. रेडमी 9ए स्पोर्टमध्ये HDप्लस IPS डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो G25 (Mediatek Helio G25) ऑक्टा कोर प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि एक्सपँडेबल स्टोरेज क्षमता आहे. रेडमी 9ए (Redmi 9A) रेडमी 9एची एमआरपी 8 हजार 499 रुपये आहे. मात्र, अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा फोन 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय इतर सवलींचा लाभ घेतल्यास हा फोन फक्त 6 हजार 299 रुपयांना मिळू शकतो. रियलमी नारझो 50आय (Realme Narzo 50i) रियलमी नारझो 50आयची किंमत 7 हजार 499 रुपये इतकी आहे. सेलमध्ये हा फोन 6 हजार 299 रुपयांना मिळत आहे. कूपन आणि बँक ऑफरचा लाभ घेतल्यात या किमतीमध्ये आणखी 500 रुपयांची सूट मिळत आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले आणि 5,000mAhची बॅटरी आहे. हे वाचा-YouTube Music च्या स्मार्ट डाउनलोडचा वापर केलात का? भन्नाट आहे हे फीचर सॅमसंग गॅलेक्सी एम12 (Samsung Galaxy M12) सॅमसंग गॅलेक्सी एम12 फोनमध्ये 90Hz डिस्प्ले आणि 6000mAh बॅटरी आहे. याशिवाय फोनमध्ये 48 मेगा पिक्सेल क्वाड कॅमेरा, 5एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2एमपी मॅक्रो लेन्स आणि 2एमपी डेप्थ कॅमेरा आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम12ची मूळ किंमत 11 हजार 999 रुपये आहे. परंतु अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये हा फोन केवळ 9 हजार 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलचा लाभ घेण्यास हरकत नाही. 17 जानेवारी ते 20 जानेवारी या काळात हा सेल सुरू राहणार आहे.
First published:

Tags: Amazon

पुढील बातम्या