Home /News /technology /

WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट

WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Features) नेहमीच त्यांच्या युजरसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतं. व्हॉट्सअ‍ॅप वापरताना युजरला चांगला अनुभव यावा, यासाठी कंपनी कॅमेरा सेटिंग्ज सुधारणं, बॅकग्राउंडमध्ये व्हॉइस नोट्स प्ले करणं यासह विविध नवीन फीचर्सवर काम करत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 18 जानेवारी: व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp New Features) नेहमीच त्यांच्या युजरसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतं. व्हॉट्सअ‍ॅप वापरताना युजरला चांगला अनुभव यावा, यासाठी कंपनी कॅमेरा सेटिंग्ज सुधारणं, बॅकग्राउंडमध्ये व्हॉइस नोट्स प्ले करणं यासह विविध नवीन फीचर्सवर काम करत आहे. कंपनी नवीन अपडेटमध्ये ड्रॉइंग टूल्स (WhasApp Drawing Tools) आणत आहे. त्यात एक नवीन पेन्सिल आयकॉन असेल, ज्यामुळे इमेज आणि व्हिडीओ फॉरवर्ड करण्यापूर्वी त्यावर ड्रॉइंग करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अगोदरच पेन्सिलचे फीचर असले तरी नवीन अपडेट आल्यानंतर यूजर्सना जाड आणि पातळ अशा दोन प्रकारच्या पेन्सिल मिळतील. या पेन्सिलचा वापर करून ड्रॉइंग काढण्याचा यूजरचा अनुभव अधिक चांगला होईल. याशिवाय लवकरच ब्लर इमेज टूल देखील उपलब्ध होणार आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या 2.22.3.5 या नव्या बीटा व्हर्जनवर अपडेटमध्ये होतं, परंतु ते डिफॉल्टनुसार डिसेबल होतं. हे फीचर अद्याप डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. लवकरच ते बीटा टेस्टर्ससाठी ऑफर केलं जाऊ शकतं. तसंच लवकरच व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप युजर्सना नवीन चॅट बबल रंग मिळेल. यूजरला डार्क मोड वापरताना नवीन डार्क ब्लू कलर मिळेल. हे अपडेट विंडोज (Windows) आणि मॅक ओएस (macOS) साठी येईल, जे व्हॉट्सअ‍ॅप बीटा डेस्कटॉप 2.2201.2.0 मध्ये चॅट बबल ग्रीन करेल. चॅट बारचा रंग आणि बॅकग्राउंडदेखील बदलेल. हे वाचा-Amazon Great Republic Day Sale: 10000 पेक्षा कमी किमतीत मिळतील हे 6 फोन नोटिफिकेशन मॅनेज करण्याचा मिळेल ऑप्शन अपडेटमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपच्या आयओएस ( iOS) यूजरला नोटिफिकेशन सेटिंग्ज मॅनेज करण्याचा ऑप्शन मिळेल. त्यामुळे त्यांना कोणत्या चॅट किंवा ग्रुप चॅटचे नोटिफिकेशन हवे आहे, ते सेट करता येईल. नोटिफिकेशनचा आवाज सुद्धा मॅनेज करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज रिअ‍ॅक्शन टॅबही असेल. यामध्ये कोणत्या मेसेजवर कोणी रिअ‍ॅक्ट केलं आहे, हे युजर्स पाहू शकतील. रिपोर्टनुसार, कंपनी बऱ्याच काळापासून या मेसेज रिअ‍ॅक्शनवर काम करत आहे. फेसबुक मेसेंजर किंवा इन्स्टाग्रामवर ज्या पद्धतीने मेसेज रिअ‍ॅक्शनचे काम चालते, त्याच पद्धतीने याचे काम चालेल. हे वाचा-IRCTC द्वारे बुक करा तात्काळ तिकीट, या सोप्या ट्रिकने मिळेल कन्फर्म Ticket व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजर्सला अ‍ॅप वापरताना चांगली सेवा देता यावी, यासाठी सतत काम करत आहे. त्यामुळे यामध्ये कोणते नवीन फीचर येतात, याकडे सर्वांचेच लक्ष असते, व नवे फीचर कशा पद्धतीने उपयोगी आहेत, याचीही माहिती घेतली जात असते.
First published:

Tags: Whatsapp, Whatsapp chat

पुढील बातम्या