जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 6000 रुपये स्वस्त मिळतोय Samsung चा 64MP कॅमेरा असणारा 5G फोन, पाहा फीचर्स आणि किंमत

6000 रुपये स्वस्त मिळतोय Samsung चा 64MP कॅमेरा असणारा 5G फोन, पाहा फीचर्स आणि किंमत

6000 रुपये स्वस्त मिळतोय Samsung चा 64MP कॅमेरा असणारा 5G फोन, पाहा फीचर्स आणि किंमत

सॅमसंगच्या (Samsung) लोकप्रिय स्मार्टफोन्सवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. Samsung Galaxy A52s 5G या फोनवर डिस्काउंट मिळत असून, ही ग्राहकांसाठी सर्वोत्तम ऑफर आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : अनेक मोबाइल कंपन्यांनी ( mobile companies) वर्षाअखेरीस आपल्या फोनवर ऑफर्स ( offers on the phone) देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही सॅमसंग फोनचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण सॅमसंगच्या (Samsung) लोकप्रिय स्मार्टफोन्सवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. Samsung Galaxy A52s 5G या फोनवर डिस्काउंट मिळत असून, ही ग्राहकांसाठी सर्वोत्तम ऑफर आहे. सॅमसंगच्या (Samsung.com/in) अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या फोनवर तब्बल 6000 रुपये कॅशबॅक मिळू शकतो. पण त्यासाठी ग्राहकांना हा फोन ICICI Bank चं कार्ड वापरून खरेदी करावा लागेल. Samsung Galaxy A52s 5G हा फोन 6GB रॅम आणि 8GB रॅम अशा दोन वेरिएंटमध्ये येतो. त्याचं 6GB मॉडेल आता फक्त 29,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असून, ग्राहक यापैकी त्याच्या आवडीच्या रंगाचा फोन खरेदी करू शकतो. या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5 इंची फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी - ओ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778 जी (Snapdragon 778G) चिपसेट प्रोसेसर आहे. त्याशिवाय 128 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज ऑप्शन आहे. ते स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येतं.

    नवीन फोन घ्यायचाय? 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील हे जबरदस्त Smartphone

    64 मेगापिक्सेल कॅमेरा - फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा मायक्रो लेन्स कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

    Samsung च्या ‘या’ लोकप्रिय सीरिजचं उत्पादन होणार बंद? काय आहे कारण

    फोनला 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25 W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ, GPS/A-GPS, एनएफसी आणि यूएसबी टाइप - सी पोर्ट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात