मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवीन फोन घ्यायचाय? 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील हे जबरदस्त Smartphone

नवीन फोन घ्यायचाय? 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील हे जबरदस्त Smartphone

तुम्ही सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमधला एखादा फोन घेण्याचा विचार करत असाल, तरीही तुमच्याकडे कित्येक स्मार्टफोन्सचा पर्याय उपलब्ध आहे.

तुम्ही सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमधला एखादा फोन घेण्याचा विचार करत असाल, तरीही तुमच्याकडे कित्येक स्मार्टफोन्सचा पर्याय उपलब्ध आहे.

तुम्ही सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमधला एखादा फोन घेण्याचा विचार करत असाल, तरीही तुमच्याकडे कित्येक स्मार्टफोन्सचा पर्याय उपलब्ध आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : सध्या कमी बजेटमध्ये चांगल्या दर्जाचे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमधला (Best smartphone under 7000) एखादा फोन घेण्याचा विचार करत असाल, तरीही तुमच्याकडे कित्येक स्मार्टफोन्सचा पर्याय उपलब्ध आहे. या बजेट स्मार्टफोनच्या यादीमधून चांगला फोन कोणता हे ठरवू शकता.

Redmi 9A -

हा सध्या बजेट स्मार्टफोनमध्ये सर्वांत चांगला पर्याय आहे. या फोनला 6.53 इंची स्क्रीन आहे. त्याचं रिझॉल्युशन 720x1500 असं असणार आहे. याला ड्युअल कॅमेरा दिला गेला आहे. यातला प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे, तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सेल आहे. तसंच 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेराही (Redmi 9A Features) देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G25 ऑक्टा कोअर प्रोसेसर दिला गेला आहे. हा फोन 3GB आणि 4GB रॅम अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 3GB वेरिएंट हा सात हजारांहून कमी किंमतीमध्ये, तर 4GB वेरिएंट हा सुमारे आठ हजार (Redmi 9A price) रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

Nokia C3 -

3GB रॅम हवा असेल, तर Nokia C3 हा आणखी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये 5.99 इंची एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे, जे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 128 GB पर्यंत वाढवता येतं. या फोनमध्ये 1.6GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत हा फोन रेडमीच्या तुलनेत मागे (Nokia C3 Features) आहे. या फोनला 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी केवळ 3040 mAh क्षमतेची आहे. हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसंच याची किंमत पाच ते सहा हजार रुपयांच्या (Nokia C3 price) दरम्यान आहे.

Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

Samsung Galaxy M01 -

तुम्हाला सॅमसंगचे फोन आवडत असतील, तर सात हजारांच्या बजेटमध्ये गॅलेक्सी M01 हा चांगला पर्याय आहे. अँड्रॉइड 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा फोन (Samsung Galaxy M01 features) तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनला 13 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ असे दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. याची रॅमही 3GB आहे. तसंच या फोनला 32GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे, जे मेमरी कार्डच्या साहाय्याने 512 GB पर्यंत वाढवता येतं. यामध्ये क्वालकोम SDM439 स्नॅपड्रॅगन 439 ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यात फेस अनलॉकची सुविधाही देण्यात आली आहे. एवढे सगळे फीचर्स असणारा हा फोन सुमारे साडेसात हजार (Galaxy M01 price) रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

Realme C11 -

स्मार्टफोन क्षेत्रात झपाट्याने पुढे आलेल्या रिअलमीचा C11 (Realme C11 features) हा फोनदेखील उत्कृष्ट बजेट फोन आहे. या फोनला 6.5 इंची एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात नोकियाप्रमाणे 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी, तर 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाइल अँड्रॉइड 11 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे, जी मेमरी कार्डच्या साहाय्याने वाढवता येते. या फोनचा यूएसपी त्याची बॅटरी आहे. रिअलमी C11 मध्ये 5000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनच्या साहाय्याने तुम्ही इतर फोनही चार्ज करू शकता. हा फोन 6,999 रुपयांपर्यंत (Realme C11 price) उपलब्ध आहे.

Moto G200 : स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा एक नवा स्मार्टफोन

JioPhone Next -

रिलायन्स आणि गुगलने संयुक्तरीत्या तयार केलेला हा फोन (JioPhone Next) अगदीच खास आहे. या फोनला 5.45 इंची एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट असणार आहे. या फोनला 2GB रॅम देण्यात आला आहे. तसंच याची इंटर्नल मेमरी 32G आहे, जी मेमरी कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 13 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी असे दोन कॅमेरे आहेत. याची बॅटरी 3500 mAh क्षमतेची आहे. इतर फोनमध्ये आढळणार नाहीत अशी वेब पेज ट्रान्स्लेशन, स्थानिक भाषा सपोर्ट, स्क्रीन रीडर आणि क्विक फाइल ट्रान्सफर असे विशेष फीचर्स (JioPhone Next features) या फोनमध्ये आहेत. याची किंमत 6,499 एवढी आहे.

Infinix Smart 4 -

चांगली बॅटरी हवी असेल, तर कमी बजेटमध्ये इनफिनिक्स स्मार्ट 4 (Infinix Smart 4) हा सर्वोत्तम पर्याय आहे. या फोनला 6.82 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच, याला तब्बल 6000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 13 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 गो ओएसवर चालतो. याचा रॅम 2GB आहे, तर इंटर्नल स्टोरेज 32GB आहे. इंटर्नल स्टोरेज मेमरी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते. या फोनची किंमत 6,999 एवढी आहे.

नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone

Techno Spark Go 2021 -

चांगली बॅटरी, चांगला डिस्प्ले आणि ड्युअल कॅमेरा अशी दोन्ही फीचर्स हवी असतील, तर टेक्नो स्पार्क गो 2021 (Techno Spark Go 2021 Features) हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनला 6.52 इंच एचडी+ एलसीडी असा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 गो या ओएसवर चालतो. याच्या वेगळ्या डिझाइनमुळे हा दिसायलाही अगदी आकर्षक वाटतो. स्टोरेजबाबत बोलायचं झाल्यास, यामध्ये 2 G रॅम आणि 32 G इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनला पाठीमागे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यातला प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल, तर सेकंडरी 2 मेगापिक्सेल आहे. पुढील बाजूला 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला 5000 mAh क्षमतेची तगडी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 6,699 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

तुम्ही बजेट एक हजार रुपयांनी वाढवू शकत असाल, तर Micromax IN 2B हा देखील एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे, केवळ आठ हजार रुपये किमतीमध्ये यात 6.5 एचडी डिस्प्ले, 4GB रॅम, 64GB स्टोरेज, ड्युअल कॅमेरा आणि 5000 mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स मिळतात. बजेटमध्ये स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर या यादीवर एकदा नक्कीच नजर टाकून तुमच्या गरजेनुसार योग्य तो फोन निवडू शकता.

First published:

Tags: Realme, Reliance Jio, Tech news