मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Samsung च्या 'या' लोकप्रिय सीरिजचं उत्पादन होणार बंद? काय आहे कारण

Samsung च्या 'या' लोकप्रिय सीरिजचं उत्पादन होणार बंद? काय आहे कारण

सॅमसंगने या वर्षी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी नोट सीरिजचे (Galaxy Note Series) स्मार्टफोन लॉन्च केलेले नाहीत. कंपनी यंदा नोट सीरिज लॉंच करणार नाही, अशी घोषणा Galaxy S 21 Series च्या लॉंचिंगवेळी कंपनीने केली होती.

सॅमसंगने या वर्षी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी नोट सीरिजचे (Galaxy Note Series) स्मार्टफोन लॉन्च केलेले नाहीत. कंपनी यंदा नोट सीरिज लॉंच करणार नाही, अशी घोषणा Galaxy S 21 Series च्या लॉंचिंगवेळी कंपनीने केली होती.

सॅमसंगने या वर्षी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी नोट सीरिजचे (Galaxy Note Series) स्मार्टफोन लॉन्च केलेले नाहीत. कंपनी यंदा नोट सीरिज लॉंच करणार नाही, अशी घोषणा Galaxy S 21 Series च्या लॉंचिंगवेळी कंपनीने केली होती.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे विविध फीचर्स असलेले स्मार्टफोन (Smart Phone) उपलब्ध आहेत. सॅमसंगच्या (Samsung) स्मार्टफोनची प्राधान्यानं खरेदी करणारा ठराविक असा वर्ग आहे. सॅमसंगच्या वेगवेगळ्या सीरिजना या वर्गाकडून नेहमीच पसंती मिळताना दिसते. तुम्ही देखील सॅमसंगच्या स्मार्टफोन सीरिजचे चाहते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सॅमसंगने या वर्षी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी नोट सीरिजचे (Galaxy Note Series) स्मार्टफोन लॉन्च केलेले नाहीत. कंपनी यंदा नोट सीरिज लॉंच करणार नाही, अशी घोषणा गॅलेक्सी एस 21 सीरिजच्या (Galaxy S 21 Series) लॉंचिंगवेळी कंपनीने केली होती. त्यातच आता कंपनी नोट सीरिजमधल्या गॅलेक्सी नोट 20 चं उत्पादन बंद करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सॅमसंग मोबाइलच्या चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.

एका अहवालानुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट सीरिजमधल्या जुन्या मॉडेल्सचं उत्पादन आता बंद केलं जाणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच पुढील महिन्यानंतर या डिव्हाइसचं उत्पादन बंद होईल. सॅमसंग कंपनीने 2021 मध्ये आतापर्यंत सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 सीरिजच्या (Samsung Galaxy Note 20 Series) 3.2 दशलक्ष म्हणजेच 32 लाख युनिटसची विक्री केली आहे.

2020 मध्ये या सीरिजच्या डिव्हाइसची 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी युनिट्सची विक्री झाली होती. या तुलनेत 2021 मध्ये या विक्रीत घट झाल्याचं दिसून आलं. स्मार्टफोन विक्रीतली घट पाहता कंपनीने या सर्वांत लोकप्रिय सीरिजच्या डिव्हाइसचं (Device) उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Smartphone सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाच, नुकसानापासून होईल बचाव

परंतु, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कंपनीने गॅलेक्सी एस 21 सीरिजमधलं फ्लॅगशिप मॉडेल Galaxy S21 Ultra नोट सीरिजमध्ये येणारी S-Pen ही सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

मागील वर्षी लॉंच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 सीरिज स्मार्टफोनमध्ये युजर्सना 108MP कॅमेरा, 12GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज सपोर्ट मिळत होता. फोनमधलं स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येत होतं. या फोनचा डिस्प्ले पॅनेल 6.9 इंच, WQHD+Dynamic AMOLED होता.

नवीन फोन घ्यायचाय? 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील हे जबरदस्त Smartphone

एका अहवालानुसार, कंपनीने आता फोल्डेबल डिव्हाइसवर (Foldable Device) लक्ष केंद्रित केलं आहे. गॅलेक्सी एस सीरिजच्या फोनचं लॉंचिंग सुरू राहील. हे स्मार्टफोन स्टायलिश S-Pen फीचरमुळे गेल्या दशकापासून युजर्सच्या पसंतीस उतरत आहेत. कंपनीनं गॅलेक्सी एस सीरिज आणि Z Flip, Z Fold सीरिजच्या डिव्हाइसमध्ये हे फीचर देऊन युजर्सना नवा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने या वर्षी Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 हे स्मार्टफोन अत्यंत रास्त दरात लॉंच केले आहेत. हे दोन्ही फोन मागील सीरिजच्या तुलनेत उत्तम फोल्डिंग टेक्नोलॉजी आणि स्टायलिश लूकचे आहेत. तसंच यात S-Pen सपोर्टही देण्यात आला आहे.

First published:

Tags: Samsung, Samsung galaxy