मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone च्या किमती वाढणार? नवा फोन खरेदी करायचा विचार करताय? लगेच करा

Smartphone च्या किमती वाढणार? नवा फोन खरेदी करायचा विचार करताय? लगेच करा

तुम्हीही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विचार न करता लगेच फोन घेणं फायद्याचं ठरेल. कारण स्मार्टफोनच्या किंमत मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नवी दिल्ली, 16 मे : सर्वसामान्य दररोजच्या वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेल, अन्न-धान्य, गॅस सिलेंडर, तेल, बिस्किटं, साबण, डाळी अशा दररोजच्या वापरातील अनेक गोष्टी महाग होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशात आता दररोजच्या वापरातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट मोबाइल स्मार्टफोनही महागणार आहेत. आजच्या इंटरनेटच्या जगात जवळपास सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. मार्केटमध्ये इतक्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या आहेत, की कित्येकजण वर्षालाही एक नवा स्मार्टफोन बदलताना दिसतात. जर तुम्हीही नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विचार न करता लगेच फोन घेणं फायद्याचं ठरेल. कारण स्मार्टफोनच्या किंमत मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज वर्तवला (Smartphone Price Hike) जात आहे.

नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, सॅमसंग (Samsung) येत्या काही महिन्यात चिप उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सेवांच्या किंमती वाढवण्याची योजना आखत आहे. चिप उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सेवांच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढवल्या जाऊ शकतात.

हे वाचा - चुकूनही Google वर सर्च करु नका 'या' गोष्टी, नाहीतर थेट खावी लागेल जेलची हवा..!

सॅमसंगच्या या निर्णयानंतर स्मार्टफोनच्या किंमती का वाढणार असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यामागे एक कारण आहे. या चिप्स बहुतेक स्मार्टफोन, टॅबलेट आणि गेमिंग कन्सोलमध्ये वापरल्या जातात. त्यामुळेच किंमत वाढू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे वाचा - जुन्या फोनची मिळेल चांगली व्हॅल्यू, विकताना या गोष्टींकडे लक्ष द्या

सॅमसंगने मागील अनेक काळापासून आपल्या चिप्स प्रोडक्शन किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. आता कोरोना काळ, मटेरियलची वाढती किंमत आणि मार्केटमधील अस्थिर परिस्थिती या अशा अनेक कारणांमुळे या ब्रँडने सेमीकंडक्टर प्रोडक्शन प्रोग्रामच्या किमतीत वाढ केली आहे. त्याचाच परिणाम स्मार्टफोन्सच्या किंमतीवर पडू शकतो आणि फोन महाग होऊ शकतात.

First published:

Tags: Samsung, Smartphone, Tech news