Home /News /technology /

चुकूनही Google वर सर्च करु नका 'या' गोष्टी, नाहीतर थेट खावी लागेल जेलची हवा..!

चुकूनही Google वर सर्च करु नका 'या' गोष्टी, नाहीतर थेट खावी लागेल जेलची हवा..!

गुगलचा आपल्या आयुष्यावर एवढा प्रभाव पडला आहे, की आपण एखाद्याला ‘इंटरनेटवर शोध’ असं म्हणण्याऐवजी ‘गुगल कर’ (Google it) असं म्हणतो. या ‘गुगल बाबा’चा भरपूर फायदा बहुतांश जण घेतात.

नवी दिल्ली, 14 मे: आजकाल कोणत्याही गोष्टीबाबत माहिती घेण्यासाठी आपण गुगलची मदत घेतो. स्वयंपाकापासून करिअरपर्यंतच्या टिप्सदेखील अनेक जण गुगलवर शोधतात. गुगल हे एक सर्च इंजिन (Google) आहे, जे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या माहितीबद्दलच्या वेबसाइट्स क्षणार्धात तुमच्यासमोर आणून ठेवतं. इतर सर्च इंजिनपेक्षा सोपं आणि साधं असल्यामुळे गुगल हे सर्वांत पॉप्युलर (Most popular search engine) असं सर्च इंजिन आहे. गुगलचा आपल्या आयुष्यावर एवढा प्रभाव पडला आहे, की आपण एखाद्याला ‘इंटरनेटवर शोध’ असं म्हणण्याऐवजी ‘गुगल कर’ (Google it) असं म्हणतो. या ‘गुगल बाबा’चा भरपूर फायदा बहुतांश जण घेतात. अर्थात, काही जण या गुगलचा भलताच वापरही करतात. करिअर टिप्स, आवडती गाणी, डान्स किंवा खेळाबाबत माहिती अशा गोष्टी शोधणं साधारण बाब आहे; मात्र काही जण गुगलवर वेगळीच माहिती शोधत असतात. एका महाभागाने तर ‘लग्नात दिसलेल्या मुलीचा नंबर’देखील गुगलवर शोधला (Funny Google Search) होता. अशा प्रकारच्या गोष्टी इंटरनेटवर व्हायरल होतात. लोकांनाही त्या हसवतात; मात्र काही गोष्टी अशादेखील आहेत ज्याबाबत गुगल सर्च केल्यास तुम्हाला थेट तुरुंगात (Google search jail) जावं लागू शकतं. या कोणत्या गोष्टी आहेत, याबाबत माहिती घेऊ या. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बॉम्ब कसा बनवायचा? कॉलेज किंवा ऑफिस आवडत नसेल, तर ती इमारत बॉम्बने उडवून द्यावी असं कोणी तरी मित्रांसोबत असताना गमतीत, मस्करीत असं बोलून दाखवलेलं असू शकतं; मात्र बॉम्ब कसा बनवायचा याबाबत गुगलवर माहिती सर्च (Don't search this on google) केली, तर सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत ती व्यक्ती नक्कीच येऊ शकते. यामुळे कायदेशीर कारवाई आणि प्रसंगी अटकही होऊ शकते. त्यामुळे गुगलवर बॉम्ब बनवण्याची पद्धत (Bomb making) शोधण्याचा विचार मनातच ठेवा. गर्भपाताशी संबंधित माहिती भारतात, तसंच अन्य काही देशांमध्ये गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे. डॉक्टरांची आणि काही प्रकरणांमध्ये न्यायालयाची परवानगी असल्याशिवाय गर्भपात (Abortion) करता येत नाही. त्यामुळे गर्भपाताशी संबंधित माहिती गुगलवर शोधली, तर तुरुंगात जावं लागू शकतं. चाइल्ड पॉर्नोग्राफी बरेच जण गुगलवर पॉर्न शोधतात. भारतामध्ये कित्येक पॉर्न साइट्स बॅन करण्यात आल्या आहेत; मात्र तरीही कोणी चाइल्ड पॉर्नोग्राफी (Child pornography) किंवा लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी कंटेंट सर्च करत असेल, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्च करणाऱ्या व्यक्तीविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत (POSCO Act) कारवाई करण्यात येते. यामध्ये दंड आणि 5 ते 7 वर्षं कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. गुगलवर तुम्ही जे काही सर्च करता, त्या सर्व गोष्टींची माहिती साठवली जाते. तसंच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सेफ्टी आणि सिक्युरिटी टीम (Google safety and security team) असते. अगदी तुम्ही इनकॉग्निटो मोड (Incognito mode) वापरूनही काही सर्च केलं, तरी गुगलकडे ती माहिती साठवली जाते. त्यामुळे इथून पुढे गुगलवर काहीही सर्च करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील याबाबत नक्कीच विचार करा.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Google

पुढील बातम्या