Home /News /technology /

तुमच्या मर्जीप्रमाणे कपडे धुवून देणार ही AI फीचरयुक्त वॉशिंग मशिन; वेळ आणि विजेचीही होणार बचत

तुमच्या मर्जीप्रमाणे कपडे धुवून देणार ही AI फीचरयुक्त वॉशिंग मशिन; वेळ आणि विजेचीही होणार बचत

ही मशिन पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट लोड वॉशिंग मशिन आहे आणि कंपनीच्या पॉवरिंग डिजिटल इंडियाच्या नव्या व्हिजनचा भाग आहे. ही वॉशिंग मशिन सॅमसंगच्या 'इको बबल' आणि 'क्विक ड्राईव्ह' टेक्नोलॉजीशी जोडलेली आहे.

  नवी दिल्ली, 8 एप्रिल: कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन असली, तरी ती लावण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. आपल्या नेहमीच्या वॉशिंग मशिनहूनही अधिक फास्ट असायला हवी, असं कधी वाटत असेल, तर ते आता खरं होणार आहे. सॅमसंगने एक नव्या रेंजमधील आर्टिफिशियल इंटेलिजेंससह हिंदी आणि इंग्रजी यूजर इंटरफेस कनेक्टेड वॉशिंग मशिन लाँच केली आहे. ही मशिन पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट लोड वॉशिंग मशिन आहे आणि कंपनीच्या पॉवरिंग डिजिटल इंडियाच्या नव्या व्हिजनचा भाग आहे. ही वॉशिंग मशिन सॅमसंगच्या 'इको बबल' आणि 'क्विक ड्राईव्ह' टेक्नोलॉजीशी जोडलेली आहे. ही टेक्नोलॉजी वेळ आणि वीज वाचवण्यासाठी मदत करते. तसंच ही मशिन 45 टक्के अधिक फॅब्रिक केअर देण्यासह वेळ आणि विजेची बचत करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. काय आहे किंमत - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, AI-इनेबल्ड लॉन्ड्री लाइन-अप भारतात 6 एप्रिलपासून सर्व रिटेल दुकानात 35,400 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. त्याशिवाय काही निवडक मॉडेलला अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाईन स्टोर सॅमसंग शॉपमधून खरेदी करता येऊ शकतं.

  (वाचा - 5 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांसाठी बनवा निळं Aadhaar कार्ड, जाणून घ्या प्रोसेस)

  ही नवी वॉशिंग मशिन रेंज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि विना व्याज EMI किंवा 990 रुपयांच्या कमी किंमतीतील EMI सारखे पर्याय उपलब्ध असतील. 21 नवे मॉडेल उपलब्ध - या नव्या लाइन-अप वॉशिंग मशिनमध्ये 21 नवे मॉडेल्स देण्यात आले आहेत. हे सर्व मॉडेल्स AI फीचरयुक्त आहेत. ही वॉशिंग मशिन सॅमसंगचे स्मार्ट डिव्हाईस गॅलेक्सी स्मार्टफोन, सॅमसंग स्मार्ट टीव्ही आणि फॅमेली हब रेफ्रिजरेटर्स, अलेक्सा, गुगल होम सारख्या व्हाईस डिव्हाईसेसशी कनेक्ट करता येऊ शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Samsung, Tech news, Techonology

  पुढील बातम्या