नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : रिलायन्स जिओच्या
(Reliance Jio) अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये कमी किमतीत अधिक बेनिफिट्स दिले जातात. Jio चे असे काही पोस्टपेड प्लॅन आहेत, जे अनेक सुविधांसह येतात. या प्लॅन्समध्ये OTT प्लॅटफॉर्म्सही दिले जातात. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचं
(Netflix, Amazon Prime, Hotstar) सब्सक्रिप्शन फ्री मिळतं. या तिघांचा मंथली सब्सक्रिप्शनचा खर्च जवळपास 667 रुपये आहे. पण या प्लॅन्समध्ये तीनही OTT प्लॅटफॉर्म्स फ्री मिळतात. जाणून घ्या Jio च्या या 3 पोस्टपेड प्लॅनबाबत.
399 पोस्टपेड प्लॅन -
Jio च्या 399 प्लॅनमध्ये युजर्सला मंथली 75GB डेटा ऑफर केला जातो. त्याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. त्याशिवाय Netflix, Amazon Prime आणि Hotstar फ्री मिळतं. तसंच Jio Apps चा फ्री अॅक्सेसही मिळतो.
Jio 599 पोस्टपेड प्लॅन -
Jio 599 रुपयांचा फॅमिली प्लॅन आहे. यात युजरला एक नवं सिम कार्ड दिलं जातं. 100GB डेटा आणि 200GB रोलओवर डेटाही मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS मिळतात. फ्री Netflix, Amazon Prime आणि Hotstar शिवाय Jio Apps चा फ्री अॅक्सेसही दिला जातो.
Jio 799 पोस्टपेड प्लॅन -
या प्लॅनमध्ये युजरला 150GB डेटा दिला जातो. त्याशिवाय 200GB रोलओवर डेटा मिळतो. हादेखील फॅमिली प्लॅन असून यात 2 सिम कार्ड मिळतात. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. Jio च्या Free Apps सह Netflix, Amazon Prime आणि Hotstar फ्री मिळतं.
दरम्यान, ऑनलाइन फ्रॉडमध्ये
(Online Fraud) मोठी वाढ झाली आहे. कोणीही कॉल किंवा मेसेज करुन टेलिकॉम कंपनीच्या नावे पर्सनल डिटेल्स, बँकिंग, आधार डिटेल्स मागितल्यास सावध व्हा. Jio नेही याबाबत ग्राहकांना अलर्ट केलं आहे. मोबाइल सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपन्या मेसेज पाठवून किंवा कॉल करुन असे डिटेल्स मागत नाहीत. डिटेल्स न दिल्यास मोबाइल फोन नंबर बंद होईल असं कोणतीही टेलिकॉम कंपनी सांगत नाही. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या नावे कॉलवर असे डिटेल्स मागितल्यास, कॉलला उत्तर न देण्याचा सल्ला वेळोवेळी दिली जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.