जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Alert! eKYC Update साठी कॉल, मेसेज आला? सावध व्हा, एका सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट

Alert! eKYC Update साठी कॉल, मेसेज आला? सावध व्हा, एका सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट

Alert! eKYC Update साठी कॉल, मेसेज आला? सावध व्हा, एका सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट

तुम्हाला eKYC च्या नावे मेसेज किंवा कॉल आल्यास सावध व्हा. KYC अपडेट करण्याच्या नावाखाली तुमचं बँक अकाउंट एका सेकंदात रिकामं होऊ शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : देशात ऑनलाइन फ्रॉडद्वारे (Online Fraud) लोकांची मोठी फसवणूक केली जात आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी फ्रॉडस्टर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. आता eKYC अपडेट करण्याच्या नावे लोकांची फसवणूक केली जात आहे. तुम्हाला eKYC च्या नावे मेसेज किंवा कॉल आल्यास सावध व्हा. केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या नावाखाली तुमचं बँक अकाउंट एका सेकंदात रिकामं होऊ शकतं. सध्या eKYC Update नावाने फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. केवायसी अपडेट करण्यासाठी आधार नंबर, बँक अकाउंटसह इतर माहिती मागितली जाते. फोन करणारा व्यक्ती स्वत:ला सर्विस प्रोव्हाइडर असल्याचं सांगतो. तो खरंच बँकेचा अधिकारी असल्याचं वाटून अनेक जण आपली माहिती शेअर करतात आणि याच एका चुकीने मोठं नुकसान करुन घेतात. WhatsApp Message द्वारे लोकांची फसवणूक केली जाते. एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून eKYC अपलोड करण्यासाठी सांगितलं जातं. त्यानंतर एक कॉल करुन अपडेट न पाठवल्यास मोबाइल नंबर बंद केला जाईल असं सांगितलं जातं. त्यामुळे घाबरुन अनेक जण डिटेल्स देतात. पुन्हा त्या नंबरवर कॉल केल्यास टीम व्हयूअर (TeamViewer) डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जातं. ते डाउनलोड केल्यानंतर फोनचा संपूर्ण अॅक्सेस फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीला मिळतो.

हे वाचा -  Fake-बनावट सॉफ्टवेअरने सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच

असा करा बचाव - कोणीही व्हॉट्सअॅप मेसेज करुन किंवा कॉल करुन केवायसी अपडेट करण्यासाठी सांगत असेल, तर सावध व्हा. अशा माहिती मागणाऱ्या कोणत्याही कॉलला उत्तर देऊ नका. कारण बँक, कोणतीही वित्तीय संस्था किंवा अधिकारी तुमचे पर्सनल बँकिंग डिटेल्स, आधार कार्ड डिटेल्स मागत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणी माहिती मागितल्यास ती देऊ नका. तसंच मोबाइल सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपन्याही मेसेज पाठवून किंवा कॉल करुन असे डिटेल्स मागत नाहीत. डिटेल्स न दिल्यास मोबाइल फोन नंबर बंद होईल असं कोणतीही टेलिकॉम कंपनी सांगत नाही. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडूनही अशा कॉलला उत्तर न देण्याचा सल्ला वेळोवेळी दिली जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात