मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता एका SMS ने PORT करा Mobile Number, पाहा सोपी प्रोसेस

आता एका SMS ने PORT करा Mobile Number, पाहा सोपी प्रोसेस

आता मोबाइल नंबर पोर्ट करण्याची सुविधा अतिशय सोपी झाली आहे. तुम्ही मोबाइल नंबरवरुन एक SMS करुन तुमचा नंबर घरबसल्या पोर्ट करू शकता.

आता मोबाइल नंबर पोर्ट करण्याची सुविधा अतिशय सोपी झाली आहे. तुम्ही मोबाइल नंबरवरुन एक SMS करुन तुमचा नंबर घरबसल्या पोर्ट करू शकता.

आता मोबाइल नंबर पोर्ट करण्याची सुविधा अतिशय सोपी झाली आहे. तुम्ही मोबाइल नंबरवरुन एक SMS करुन तुमचा नंबर घरबसल्या पोर्ट करू शकता.

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : टेलिकॉम कंपन्यांकडून (Telecom Company) सतत टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली जात आहे. दर वाढण्यासह कंपन्यांच्या सर्विसमध्येही घसरण होत आहे. ज्यावेळी तुम्ही नवा प्लॅन किंवा नंबर घेता त्यावेळी टेलिकॉम कंपन्या अनेक सुविधा देण्याचे दावे करतात. पण त्या सर्व सर्विस मिळतात असं होत नाही.

अशात अनेक ग्राहक कंटाळून नंबर पोर्ट करण्याचा विचार करतात. इतर टेलिकॉम ऑपरेटरची सेवा घेण्याचा विचार करतात. आता मोबाइल नंबर पोर्ट (Mobile Number Port) करण्याची सुविधा अतिशय सोपी झाली आहे. तुम्ही मोबाइल नंबरवरुन एक SMS करुन तुमचा नंबर घरबसल्या पोर्ट करू शकता.

दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरकडून स्वस्त प्लॅन घ्यायचा असेल, तर तुमचा नंबर सहजपणे पोर्ट करू शकता. नंबर पोर्ट करण्याचा फायदा म्हणजे, तुम्ही नंबर न बदलता टेलिकॉम कंपनी बदलू शकता आणि नव्या कंपनीची सेवा घेऊ शकता. या संपूर्ण प्रक्रियेत तुमचं सिम कार्ड बदललं जाईल. घरबसल्या तुम्ही तुमचं कार्ड पोर्ट करू शकता.

काय आहे पोर्टेबिलिटी सुविधा?

मोबाइल नंबर पोर्ट करण्याची सुविधा 2009 मध्ये सुरू करण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत तुम्ही 1900 नंबरवर एक मेसेज करुन तुमचा नंबर पोर्ट करू शकता.

हे वाचा - Aadhaar Cardमध्ये जन्मतारीख चुकल्यास खोळंबतील महत्त्वाची कामं,घरबसल्या करा अपडेट

मागील काही दिवसांपूर्वी TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना पोर्टेबिलिटीबाबत काही आदेश दिले होते. TRAI ने काही प्रीपेड व्हाउचरमध्ये आउटगोइंग SMS सुविधा न देणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांवर तीव्र आक्षेप घेतला होता.

प्रीपेड प्लॅन सुरू असूनही, त्यात पैसे असूनही मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेण्यासाठी यूपीसी (यूनिक पोर्टिंग कोड) कोड तयार करण्यासाठी दिलेल्या 1900 नंबरवर SMS पाठवता येत नसल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी TRAI कडे केल्या होत्या.

त्यावर TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना यासंदर्भात आदेश दिले होते. या आदेशात TRAI ने सांगितलं, की टेलिकॉम मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी रेग्लुलेशन, 2009 अंतर्गत प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना मोबाइल फोन पोर्टेबिलिटीच्या सोयीसाठी 1900 नंबरवर UPC (यूनिक पोर्टिंग कोड) सह SMS पाठवण्याची सुविधा द्यावी. कोणताही ग्राहक कितीही रुपयांचा रिचार्ज करत असेल, तरी रिचार्जची किंमत विचारात न घेता सर्व ग्राहकांना ही सुविधा दिली जावी.

हे वाचा - PAN-Aadhaar लिंक करण्यास समस्या येतेय? जाणून घ्या काय असतील कारणं, अशी होईल मदत

सिम कार्ड SMS द्वारे कसं पोर्ट कराल?

सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी मोबाइल नंबरवरुन 1900 नंबरवर SMS करावा लागेल. तुम्ही PORT मोबाइल नंबर लिहून 1900 वर पाठवा. त्यानंतर फोन नंबरवर एक यूनिट पोर्टिंग कोड येईल. हा कोड नंबर 15 दिवसांपर्यंत मान्य असेल. हा कोड नंबर घेऊन तुम्ही ज्या कंपनीची सेवा घ्यायची आहे, त्या जवळच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या रिटेल स्टोरवर जा. तिथे नंबर पोर्ट करण्याबाबत सांगा.

पोर्ट करण्यावेळी तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि ओळखपत्राची कॉपी घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. कागदपत्रांचं वेरिफिकेशन झाल्यानंतर सिम बंद होईल आणि कंपनी नवं सिम देईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास आठवडाभर लागू शकतो.

First published:

Tags: Mobile Phone, Sim, Smartphone, Tech news, Telecom service