मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /5 मिनिटांत 3 लाखांहून अधिकांनी घेतला Redmi चा हा फोन, काय आहे खास

5 मिनिटांत 3 लाखांहून अधिकांनी घेतला Redmi चा हा फोन, काय आहे खास

पहिल्या सेलमध्ये केवळ 5 मिनिटांत Redmi K50 सीरिजच्या 3.3 लाखांहून अधिक फोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

पहिल्या सेलमध्ये केवळ 5 मिनिटांत Redmi K50 सीरिजच्या 3.3 लाखांहून अधिक फोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

पहिल्या सेलमध्ये केवळ 5 मिनिटांत Redmi K50 सीरिजच्या 3.3 लाखांहून अधिक फोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नवी दिल्ली, 22 मार्च : भारतात रेडमीच्या (Redmi Xiaomi) स्मार्टफोनची मोठी क्रेझ आहे. सध्या अशाच एका रेडमीच्या Redmi K50 सीरीज स्मार्टफोनची मोठी चर्चा आहे. पहिल्या सेलमध्ये या सीरिजमधील दोन स्मार्टफोन Redmi K50 आणि Redmi K50 Pro ने रेकॉर्डब्रेक सेल केला आहे. पहिल्या सेलमध्ये केवळ 5 मिनिटांत Redmi K50 सीरिजच्या 3.3 लाखांहून अधिक फोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या सीरिजचा पहिला सेल चीनमध्ये झाला होता. चीनमध्ये ही रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा असणाऱ्या Redmi K50 स्मार्टफोनच्या पहिल्या सीरिजने मोठी विक्री करून दिली आहे.

हे वाचा - स्वस्तात खरेदी करता येईल 50 MP कॅमेरा असणारा 5G Smartphone,पाहा OnePlus 9RT ऑफर

Redmi K50 चे काय आहेत फीचर्स -

या फोनला 6.67 इंची QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला डाइमेंसिटी 8100 चिपसेट Octa-core MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आहे. फोटोसाठी Redmi K50 ला 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच 67 W फास्ट चार्जिंगसह 5500mAh आहे.

चीनमध्ये Redmi K50 स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह लाँच झाला आहे. या फोनची किंमत भारतीय रुपयाप्रमाणे जवळपास 28,800 रुपये आहे.

हे वाचा - 16000 रुपयांचा Realme Smartphone 549 रुपयांत, Flipkart ची जबरदस्त डील

Redmi K50 Pro फीचर्स -

Redmi K50 Pro फोनला 6.67 इंची QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर डाइमेंसिटी 9000 चिपसेट Octa-core MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आहे. फोटोसाठी 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे. या फोनला 120 W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी आहे.

चीनमध्ये Redmi K50 Pro फोन 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह आहे. या फोनची सुरुवातीची भारतीय रुपयानुसार किंमत 36000 रुपयांपर्यंत आहे.

दरम्यान, भारतात फ्लिपकार्टवर (Flipkart) रियलमी सुपर 9 डेज (Flipkart Realme Super 9 Days Sale) सेल सुरू आहे. हा सेल 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत असेल. या सेलमध्ये रियलमी स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळतो आहे.

First published:

Tags: Realme, Smartphone, Tech news, Xiaomi, Xiaomi redmi