मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्वस्तात खरेदी करता येईल 50 MP कॅमेरा असणारा 5G Smartphone, OnePlus 9RT वर जबरदस्त डिस्काउंट

स्वस्तात खरेदी करता येईल 50 MP कॅमेरा असणारा 5G Smartphone, OnePlus 9RT वर जबरदस्त डिस्काउंट

जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर OnePlus 9RT 5G एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. या फोनवर इन्स्टंट डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑप्शन मिळत आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 21 मार्च : ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर (Amazon) सध्या अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक (Smartphone Offers on Amazon) ऑफर्स मिळत आहेत. Amazon वर तुम्ही कमी किमतीत प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर OnePlus 9RT 5G एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. या फोनवर इन्स्टंट डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑप्शन मिळत आहेत.

काय आहे किंमत आणि ऑफर्स -

OnePlus 9RT 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 46,999 रुपये आहे. या फोनवर 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट Citi bank कार्ड्सवर मिळतो आहे.

त्याशिवाय या फोनवर 18000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही घेता येऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही फोनची एक्सचेंज व्हॅल्यू त्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून असते. तुमचा फोन चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर ऑफरमधील संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळवता येईल.

OnePlus Smartphone तुम्ही EMI ऑप्शनवरही खरेदी करू शकता. नॅनो सिल्व्हर आणि हॅकर ब्लॅक अशा दोन रंगात फोन खरेदी करता येईल.

हे वाचा - स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपचे दर वाढणार; पाहा काय आहे कारण

काय आहेत फीचर्स -

OnePlus 9RT 5G फोन डुअल सिम सपोर्टसह असून अँड्रॉइड 11 बेस्ड Oxygen OS 11 वर काम करतो. यात ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह येतो. या फोनला 6.62 इंची फुल HD+ AMOLED स्क्रिन देण्यात आली आहे.

फोनला 4500 mAh बॅटरी असून ती 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फिंगरप्रिंट सेंसर, 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, JPS असे अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.

हे वाचा - चक्क 'Apple Watch' मुळे वाचला तरुणाचा जीव, वाचा नेमकं काय घडलं

कॅमेरा -

या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनची मेन लेन्स 50 मेगापिक्सल आहे. त्याशिवाय 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Oneplus, Smartphone, Tech news