नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : सध्याच्या काळात सर्वच सिमकार्ड कंपन्या या आपल्या ग्राहकांसाठी विविध बंपर सुविधा देत असतात. त्यातून युजर्सला जास्तीत जास्त फायदा व्हावा हा कंपन्यांचा हेतू असतो. परंतु jio ने फार कमी काळात (Recharge now and pay letter) देशातील युजर्सचं मन जिंकलं आहे. आता आपण jio च्या अशा एका Plans बद्दल (how to get free data in jio without recharge) माहिती घेणार आहोत ज्याचा फायदा युजर्सला संकटकाळात होणार आहे.
गरज पडल्यास तात्काळ मिळणार डाटा
jio च्या Emergency डाटा प्लॅनमुळं युजर्सला कोणतेही पैसे न भरता डाटा रिचार्ज करता येणार आहे. जर युजर अडचणीच्या काळात असेल तर या प्लॅनला Activate करता येईल. त्यामुळं या प्लॅनमार्फत (how to get free data in jio without recharge) युजर्सला तात्काळ डाटा मिळेल आणि त्याचं पैसे युजरला नंतरही देता येणार आहे.
Recharge now and pay letter ची ही अशी आहे ऑफर
या प्लॅनला लागू करण्यासाठी युजर्सला सर्वात आधी Emergency data plan ला सेलेक्ट करून 1GB मिळेल, त्यासाठी तातडीने पेमेंट करायची गरज नाही. गरजेनुसार युजर्सला या ऑफरमार्फत डाटा मिळेल, त्यानंतर काही दिवसांनी याचे पेमेंट केले तरी चालणार आहे.
काय असेल या प्लॅनचं शुल्क?
या ऑफरच्या माध्यमातून युजर्सला 11 रुपयांमध्ये 1GB डाटा मिळेल. त्याचबरोबर या प्लॅनला पाचवेळा लागू करता येईल. अशाप्रकारे जिओ युजरला 55 रुपयांमध्ये 5GB इंटरनेटची सुविधा मिळेल. या ऑफरचे पैसे भरण्यासाठी कोणतीही सीमा किंवा मुदत दिलेली नाही. युजर्सला वाटेल तेव्हा याचे पैसे भरता येतील.
कसं कराल Apply?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी My jio app ओपन करा. त्यात मेन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल सर्विसेसच्या पर्यायावर क्लिक करून Emergency data plan ला सेलेक्ट करा. तिथे क्लिक करून हा Plan युजर्सला Activate करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Reliance jio postpaid