मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Windows 11: `विंडोज 11` यूजर्ससाठी ठरतंय डोकेदुखी; हे` फीचर्स ठरताहेत निकामी; युजर्समध्ये नाराजी

Windows 11: `विंडोज 11` यूजर्ससाठी ठरतंय डोकेदुखी; हे` फीचर्स ठरताहेत निकामी; युजर्समध्ये नाराजी

व्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) काही फीचर्स (Features) लोड होत नसल्याचं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विंडोज 11 चा वापर करणाऱ्या सर्व युजर्सला सांगितलं आहे.

व्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) काही फीचर्स (Features) लोड होत नसल्याचं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विंडोज 11 चा वापर करणाऱ्या सर्व युजर्सला सांगितलं आहे.

व्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) काही फीचर्स (Features) लोड होत नसल्याचं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विंडोज 11 चा वापर करणाऱ्या सर्व युजर्सला सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर:  : मायक्रोसॉफ्ट विंडोज 11 (Microsoft Windows 11) ज्या दिवसापासून रोलआऊट (Rollout) झालं आहे, त्या दिवसापासून मायक्रोसॉफ्ट युजर्सला सातत्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता विंडोज 11 चा वापर करणाऱ्या युजर्सला एका नव्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. या नव्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Operating System) काही फीचर्स (Features) लोड होत नसल्याचं मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विंडोज 11 चा वापर करणाऱ्या सर्व युजर्सला सांगितलं आहे. यामुळे युजर्स मध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. भारतातील सर्वात मोठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या माहितीनुसार, ``विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये टच की बोर्ड, स्निपिंग टूल्स, इमोजी पॅनेलसारखे प्रचलित फीचर्स त्यांच्या एक्सापायर्ड सर्टिफिकेटमुळं (Expired Certificate) योग्य पध्दतीनं लोड होत नाहीत. या सर्टिफिकेटची एक्सपायरी म्हणजेच अंतिम मुदत 31 ऑक्टोबर होती``. विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीममधील काही दोष किंवा समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

    कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टिम कडं पॅच स्निपिंग टूलच्या (Patch Snipping Tool) समस्येवर कोणताही उपाय उपलब्ध नाही. यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीनं यावर एक उपाययोजनाही शेअर केली आहे. यानुसार, जर युजर्सला स्निपिंग टूल्ससंबंधी त्रास कमी करायचा असेल तर त्यांना त्यांच्या सिस्टीमच्या किबोर्डवरील प्रिंट स्क्रिन (Print Screen) हा ऑप्शन वापरावा लागेल. त्यानंतर स्क्रिनशॉट डॉक्युमेंटमध्ये लगेच पेस्ट करावं लागेल. जो भाग युजर्सला फोटोच्या स्वरुपात हवा आहे, युजर्स तो पेंट अप्लिकेशनमध्येही पेस्ट करू शकतात. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ही पध्दत वापरण्याचा सल्ला युजर्सला दिला आहे.

    Job Alert: केंद्रीय विद्यालय कामठी इथे शिक्षक पदांसाठी होणार भरती; 27,000 पगार

    रिलीजनंतर लगेचच युजर्सकडून तक्रारींचा पाऊस

    मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ज्या दिवशी ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम रोलआऊट केली, त्यादिवसापासून तिची तपासणी आणि निरीक्षण सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही ऑपरेटिंग सिस्टीम रिलीज झाल्यानंतर लगेचच अनेक युजर्सकडून `पीसी`च्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. कॉम्प्युटर प्रोसेसर उत्पादक `एएमडी`नं या तक्रारींना दुजोरा दिला आहे.

    कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतेवेळी काही प्रोसेसरवर मेजर आणि फंक्शनल L3 कॅशे लॅटन्सी तीनपट जास्त झाल्याचं दिसून आलं आहे. या समस्येमुळं, प्रोसेसरच्या (Processer) सर्वात वेगवान कोअरवर थ्रेड शेड्युल करण्यासाठी प्राधान्य असलेल्या कोअरला मान्यता दिलेली नाही.

    दर आठवड्याला कंपनी यापैकी बहुतांश समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, अद्याप काही समस्यांची सर्व माहिती मिळालेली नसल्याचं मायक्रोसॉफ्ट कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    First published: