मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदीची संधी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे.

Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे.

Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Realme 8 5G वर डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनवर 500 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर या फोनच्या 8 GB रॅम आणि128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. तसंच Realme 8 5G च्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. ही ऑफर 28 ऑगस्टपर्यंत आहे.

Realme 8 5G स्पेसिफिकेशन्स -

- 6.5 इंची फुल HD+ डिस्प्ले

- 2400 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन

- मीडियाटेक डायमेंसिटी 700 5G प्रोसेसर

- अँड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टम

- 5000mAh

- 18W फास्ट चार्जर

निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत करा मुंबई-पुणे प्रवास, Vista Dome Coaches असे करा बुक

कॅमेरा -

फोटोसाठी Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. या फोनला 5 नाईट स्केप फिल्टर देण्यात आले आहेत. तर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

Smartphone वापरताना करू नका या चुका, अन्यथा मोबाईल स्पोट व्हायचा धोका!

Realme 8 5G स्मार्टफोनची Samsung Galaxy M42 5G फोनला टक्कर असेल. सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 705G प्रोसेसर देण्यात आला आहे. Knox सिक्योरिटी फीचर असणारा सॅमसंगचा हा पहिला स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy M42 5G फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच फोनला 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Realme, Smartphone, Tech news