मुंबई, 28 ऑगस्ट : मोबाईल फोनचा स्फोट (Smartphone Blast) झाल्याच्या कित्येक घटना आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. कधी मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात, तर कधी घरात, किंवा मग कोणाच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाल्याचे व्हिडिओ (Smartphone blast video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कित्येक वेळा या स्फोटांमुळे मोठा अपघात होऊन काहींना आपला जीवही गमवावा (Smartphone blast death) लागला आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच एका विमानात स्मार्टफोनचा स्फोट झाल्यामुळे, सर्व प्रवाशांना खाली उतरायला लागले होते. या सर्व घटनांमुळेच स्मार्टफोनच्या सुरक्षेबाबत (Smartphone battery safety) अधिक जागरुक असणे गरजेचे ठरत आहे. स्मार्टफोनच्या स्फोटाचं सर्वात मोठं कारण म्हणजे, त्याची बॅटरी. ओव्हरहीट म्हणजे, प्रमाणापेक्षा जास्त गरम झाल्यामुळे ही बॅटरी (Mobile battery blast) फुटू शकते. अशा वेळी कंपनीला नुकसान भरपाई मागूनही फायदा होत नाही, कारण बऱ्याच अपघातांमध्ये कंपन्या यूझर्सनाच दोषी ठरवून मोकळ्या होतात. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या करणं तुम्ही टाळल्यास, अशा प्रकारच्या (how to avoid mobile blast) अपघातांपासूनही बचाव करू शकता. बॅटरी ओव्हरहीट (Smartphone overheat problem) होणे हे स्मार्टफोनचा स्फोट होण्याचं मुख्य कारण असतं. यासाठीच कंपनीने दिलेला ओरिजिनल चार्जरच (Use original charger) वापरणे गरजेचे असते. चार्जिंगचा वेग वाढवण्यासाठी जास्त क्षमतेचा चार्जर, किंवा मग डुप्लिकेट कंपनीचा चार्जर वापरण्याची चूक कधीही करू नका. अशामुळे बॅटरीवर अतिरिक्त ताण येऊन ती फुटण्याची (Smartphone battery blast) शक्यता असते. यासोबतच, तुमच्या फोनमधील बॅटरी बदलण्याची वेळ आल्यास, केवळ कंपनीची ओरिजिनल बॅटरीच घ्यावी. केवळ स्वस्त आहे म्हणून इतर कोणती बॅटरी घेऊ नये. आजकाल बऱ्याच स्मार्टफोन्समध्ये बॅटरी बदलण्याची सोय नसते. अशा वेळी तुम्हाला बॅटरीची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी फोन जास्त गरम न होऊ देणे हा मुख्य पर्याय आहे. तुमचा स्मार्टफोन गरम होतं आहे, असं वाटल्यास तातडीने त्याचं चार्जिंग बंद (Mobile charging limit) करावं. तसेच, थंड होईपर्यंत तो वापरणंही टाळावं. अधिक चार्ज झाल्यावर, अधिक वापर झाल्यावर किंवा जास्त वेळ उन्हात असल्यावरही फोन ओव्हरहीट (Mobile overheating) होऊ शकतो. कित्येक लोक आपला फोन चार्ज करण्यासाठी गाडीमधील चार्जरचा (Avoid car chargers) वापर करतात. मात्र, असं करणंही फोनच्या बॅटरीला डॅमेज करू शकतं. यासोबतच, पॉवर स्ट्रिप किंवा एक्सटेंशन कॉर्डचा वापर करून फोन चार्ज करणंही धोकादायक ठरू शकतं. तुमचा फोन जर खाली पडून कुठे तडा गेला असेल, किंवा अन्य कोणत्या प्रकारे फोन डॅमेज (Repair damaged phone) झाला असेल, तर तसा फोन वापरणं टाळा. अशामुळे आत शॉर्ट सर्किट होऊनही फोनचा स्फोट होऊ शकतो. तसेच, फोन दुरुस्त करण्यासाठी एखाद्या लोकल दुकानात न जाता केवळ कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्येच जाणं फायद्याचं ठरतं. चार्जिंग सुरू असताना फोनचा वापर (Avoid using phone while charging) केल्यानेही बॅटरी मोठ्या प्रमाणात डॅमेज होते. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करणं टाळून, तुम्ही तुमच्या फोनची लाईफ तर वाढवालच. पण त्यासोबतच स्मार्टफोनचा स्फोट होणेही टाळू शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.