मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत करा मुंबई-पुणे प्रवास, Vista Dome Coaches साठी असं करा बुकिंग

निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत करा मुंबई-पुणे प्रवास, Vista Dome Coaches साठी असं करा बुकिंग

व्हिस्टाडोम कोचमध्ये मोठ्या खिडक्या, वायफाय, छतावरही पारदर्शक काचा, मोठे स्लायडिंग दरवाजे, आरामदायी सीट्स अशी वैशिष्ट्यं आहेत. पाहा Vista Dome Coaches साठी कसं कराल बुकिंग...

  • Published by:  Karishma

मुंबई, 28 ऑगस्ट : 15 ऑगस्टपासून मुंबई-पुणे (Mumbai-Pune) मार्गावर डेक्कन क्विनला व्हिस्टाडोम कोच (Vista Dome) जोडून एक्सप्रेस चालवण्यात आली. पुणे-मुंबई मार्गावरील गाडीला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. पहिल्यांदा 26 जून रोजी व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. या ट्रेनला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या खास कोचमुळे प्रवाशांना ट्रेनमधून बाहेरचं निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे.

व्हिस्टाडोम कोचमध्ये मोठ्या खिडक्या, वायफाय, छतावरही पारदर्शक काचा, मोठे स्लायडिंग दरवाजे, आरामदायी सीट्स अशी वैशिष्ट्यं आहेत. या कोचसाठी मंबई ते पुणे 835 रुपये भाडं असणार आहे. तसंच मंबई ते लोणावळा 655 रुपये या कोचसाठी भाडं आहे.

व्हिस्टाडोम कोचसाठी कसं कराल बुकिंग?

- Vista Dome Coaches बुक करण्यासाठी IRCTC वेबसाईटवर जावं लागेल.

- www.irctc.co.in या वेबसाईटवर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावं लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.

- कुठून ते कुठपर्यंतचं स्टेशन सिलेक्ट करा. त्यानंतर प्रवासाची तारीख सिलेक्ट करा.

- AC Chair Car किंवा Exective Chair Car सिलेक्ट करा. इथे तिकाटाचे दर दिसतील.

- तिकीट बुक करण्यासाठी Book Now वर क्लिक करा.

- त्यानंतर पुढील पेजवर प्रवाशाचे संपूर्ण डिटेल्स दिसतील.

तुमच्या सोबत Online Fraud झालाय? बँक या परिस्थितीत देईल नुकसान भरपाई, वाचा RBI नोटिफिकेशन

ट्रेन नंबर 02124 सकाळी 7.15 वाजता पुण्याहून निघेल आणि 10.25 वाजता मुंबईत CSMT येथे पोहोचेल.

तर ट्रेन नंबर 02123 CSMT वरुन संध्याकाळी 5.10 वाजता निघेल आणि पुण्यात 8.25 रोजी पोहोचेल.

मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, खडकी, शिवाजी नगर या स्थानकांवर थांबेल. या व्हिस्टाडोम कोचमध्ये 44 सीट्स आहेत.

दरम्यान, मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसलाही व्हिस्टाडोम कोच असणार आहे. ट्रेन नंबर 12051-12052 या ट्रेन दादर-मडगाव-दादर या मार्गावर धावतील.

First published: