नवी दिल्ली, 7 डिसेंबर : Flipkart वर सध्या मोबाइल बोनान्जा सेल (Flipkart Bonanza Smartphone Sale 2021) सुरू आहे. हा सेल केवळ दोन दिवस आहे. स्मार्टफोनसाठीचा हा सेल 7 ते 8 डिसेंबरपर्यंत सुरू आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये 5G स्मार्टफोनची जबरदस्त ऑफर आहे. कमी बजेटमध्ये चांगल्या फीचरसह 5G फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Realme Narzo 30 5G फोनवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर आहे. जर तुम्हाला या फोनवरील संपूर्ण ऑफर घेता आली, तर हा फोन तुम्हाला केवळ 99 रुपयांत खरेदी करता येईल. Realme Narzo 30 5G ची किंमत 17,999 रुपये आहे. पण सेलमध्ये हा फोन 16,999 रुपयांत उपलब्ध आहे. फोनवर हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे. पण हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.
10 हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या `या` स्मार्टफोन्समध्ये आहेत आकर्षक फीचर्स
Realme Narzo 30 5G खरेदी करताना अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड 5 टक्के डिस्काउंट देत आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 850 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे फोनची किंमत 16,149 रुपये होईल. त्यानंतर एक्सचेंज ऑफरही आहे, यातही फोनची किंमत आणखी कमी होते.
28 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळतोय हा iPhone, पाहा काय आहे ऑफर
या 5G फोनवर 16050 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळते आहे. जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास इतका डिस्काउंट मिळवता येईल. फोनची कंडिशन चांगली असेल, फोनचा लेटेस्ट मॉडेल असेल, तरच हा 16050 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. संपूर्ण ऑफर्स मिळाल्यास फोन केवळ 99 रुपयांत खरेदी करता येईल.