Home /News /technology /

28 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळतोय हा iPhone, पाहा काय आहे ऑफर

28 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळतोय हा iPhone, पाहा काय आहे ऑफर

जर तुम्ही iPhone घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही मागील वर्षी लाँच झालेला iPhone SE स्वस्तात खरेदी करू शकता.

  नवी दिल्ली, 6 डिसेंबर : Flipkart वर बिग बचत सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक कंपन्या चांगल्या फीचर असणाऱ्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल. जर तुम्ही iPhone घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही मागील वर्षी लाँच झालेला iPhone SE स्वस्तात खरेदी करू शकता. 64 GB iPhone SE वेरिएंट तुम्ही 27,999 रुपयांत खरेदी करू शकता. या सेलमध्ये 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी होऊन 32,999 रुपये झाली आहे. तर 256 GB वेरिएंट डिस्काउंटमध्ये 42,999 रुपयांत खरेदी करता येईल. फोनच्या एक्सचेंज ऑफर अंतर्गत खेरदी केल्यास 16,050 रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. फोन खरेदी करताना कॅनरा बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटही मिळेल. विशेष बाब म्हणजे सेलमध्ये Apple चा फोन खरेदी केलेल्या युजर्सला 499 रुपयांत असणाऱ्या Disney+ Hotstar चं फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल.

  2 लाख रुपयांहून कमी किंमतीत मिळतेय Maruti Wagon R, पाहा डिटेल्स

  iPhone SE Specifications - - 750x1334 पिक्सल रेजॉल्यूशन - 4.7 इंची IPS LCD डिस्प्ले - A13 बायॉनिक चिपसेट - फास्ट चार्जिंग सपोर्टसह IP67 रेटिंग - डस्ट आणि वॉटर रजिस्टेंट

  WhatsApp Scam: अनोळखी नंबरवरुन Video Call आल्यास सावधान, असं केलं जातंय ब्लॅकमेल

  कॅमेरा - फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनसह 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 60fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्ड करतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनीने 7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. iPhone SE ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर ऑप्शनमध्ये येतो. फिजिकल होम बटनसह येणारा कंपनीचा हा शेवटचा आयफोन होता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Tech news

  पुढील बातम्या