मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Best Smartphones: दहा हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या `या` स्मार्टफोन्समध्ये आहेत आकर्षक फीचर्स; एकदा बघाच

Best Smartphones: दहा हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या `या` स्मार्टफोन्समध्ये आहेत आकर्षक फीचर्स; एकदा बघाच

या यादीत सॅमसंग (Samsung), रिअलमी (Realme), मोटोरोला (Motorola) या कंपन्यांचे लोकप्रिय बजेट फोन्स समाविष्ट आहेत.

या यादीत सॅमसंग (Samsung), रिअलमी (Realme), मोटोरोला (Motorola) या कंपन्यांचे लोकप्रिय बजेट फोन्स समाविष्ट आहेत.

या यादीत सॅमसंग (Samsung), रिअलमी (Realme), मोटोरोला (Motorola) या कंपन्यांचे लोकप्रिय बजेट फोन्स समाविष्ट आहेत.

मुंबई, 06 डिसेंबर:  बाजारात विविध रेंजमधले स्मार्टफोन्स (Smartphone) उपलब्ध आहेत. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपन्या त्यांच्या फोनच्या वेगवेगळ्या रेंजमधल्या स्पेसिफिकेशन्सकडे (Specifications) विशेष लक्ष देत असतात. अशा स्थितीत तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोनच्या शोधात असाल तर आम्ही काही सर्वोत्तम स्मार्टफोन्सची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या यादीत सॅमसंग (Samsung), रिअलमी (Realme), मोटोरोला (Motorola) या कंपन्यांचे लोकप्रिय बजेट फोन्स समाविष्ट आहेत.

Realme Narzo 30A (किंमत 8999 रुपये)

रिअलमी नार्झो 30A मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचं रिझॉल्युशन (Resolution) 720*1600 पिक्सेल आहे. डिस्प्लेची शैली वॉटर ड्रॉप नॉच आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G85 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB/4GB LPDDR 4x रॅम आणि 32GB/64 GB असे पर्याय उपलब्ध आहेत. पॉवरसाठी 6000mAh ची बॅटरी असून ती 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Micromax In Note 1 (किंमत 9,999 रुपये)

या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझॉल्युशनसह देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ (Mediatek Helio) G85 प्रोसेसर (Processor) देण्यात आला आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000 mAhची बॅटरी देण्यात आली असून, ती 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

2 लाख रुपयांहून कमी किंमतीत मिळतेय Maruti Wagon R, पाहा डिटेल्स

Samsung Galaxy F02S (किंमत 9499 रुपये)

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ Infinity-V डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा Aspect Ratio 20:9 आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट आहे. या स्मार्टफोनचे 3GB रॅम +32 GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पॉवरसाठी Samsung Galaxy F02S या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Motorola Moto G10 Power (किंमत 9,999 रुपये)

मोटो जी 10 पॉवर या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ स्क्रीन देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ आहे. मोटो जी 10 पॉवर या फोनमध्ये एफ/1.7 अॅपर्चरसह 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 6000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनसोबत कंपनीनं 20 वॅटचा चार्जरदेखील दिला आहे.

First published:

Tags: Smartphones, Tech news