जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुम्ही सर्च केलेली माहिती विश्वासार्ह नसल्यास Google स्वत:चं देणार इशारा, वाचा या नव्या फीचरबाबत

तुम्ही सर्च केलेली माहिती विश्वासार्ह नसल्यास Google स्वत:चं देणार इशारा, वाचा या नव्या फीचरबाबत

तुम्ही सर्च केलेली माहिती विश्वासार्ह नसल्यास Google स्वत:चं देणार इशारा, वाचा या नव्या फीचरबाबत

Google सर्च केलेली कोणतीही माहिती विश्वसनीय नसेल, तर गुगलकडून याबाबत वॉर्निंग येईल, त्यात माहिती सतत अपडेट होत असल्याचं सांगितलं जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जून : सोशल मीडियावर (Social Media) कोणतीही गोष्ट लगेचच व्हायरल होते. लोकही मेसेजची सत्यता पडताळणी न करता ते मेसेज फॉर्वर्ड, शेअर करतात. अशा अनेक गोष्टी, बातम्या पूर्णपणे सत्य नसतात. याच गोष्टी लक्षात घेता गुगल (Google) आता अशी माहिती किंवा बातम्या ज्या युजर्स गुगलवर सर्च (Google Search) करत असतील, त्याबाबत इशारा देईल. टेक्नोलॉजी तज्ज्ञ यावर काम करत असून, असा कंटेंट सर्च केल्यानंतर, जो विश्वसनीय नाही किंवा त्यात सतत अपडेट होत असेल, तर याबाबत युजरला माहिती दिली जाईल. या नव्या फीचरमध्ये सर्च केलेली कोणतीही माहिती विश्वसनीय नसेल, तर गुगलकडून याबाबत वॉर्निंग येईल, त्यात माहिती सतत अपडेट होत असल्याचं सांगितलं जाईल. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये नव्या अपडेटची घोषणा करत सांगितलं, की ज्यावेळी सर्च इंजिनला त्या माहितीबाबत अधिक परिणाम मिळतील, त्यावेळी युजर्स नंतर ही माहिती पुन्हा पाहू शकतात. केवळ या परिस्थितीत मिळणार इशारा - गुगलवर असा मेसेज केवळ त्याचवेळी येईल, जेव्हा एखादी बातमी, माहिती अतिशय वेगाने विकसित होत असेल आणि कोणत्याही स्त्रोताकडून ती माहिती कन्फर्म झाली नसेल, त्याचवेळी Google त्या सर्चबाबत इशारा देईल. गुगल सर्च नेहमी आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्वात उपयोगी परिणांमासह असेल. कधी-कधी युजर सर्च करत असलेली माहिती ऑनलाईनही दिसत नाही, असंही Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(वाचा -  Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस )

या टूलद्वारे फेक न्यूज कमी होण्यास मदत होईल. नव्या टूलमुळे चुकीची, फेक माहिती Google समोर येण्यापासून इशारा देईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात