मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कारगाड्यांच्या ऑनलाइन बुकिंगचा ट्रेंड वाढला; महिंद्रा, ओला आणि टाटा कंपनीच्या कार खरेदीमध्ये झपाट्याने वाढ

कारगाड्यांच्या ऑनलाइन बुकिंगचा ट्रेंड वाढला; महिंद्रा, ओला आणि टाटा कंपनीच्या कार खरेदीमध्ये झपाट्याने वाढ

कार कंपन्या या फीचर्ससह वेगवेगळ्या सुविधा असलेल्या कारगाड्या बाजारात आणत आहे. त्यामुळं आता कार खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्गही पुढे सरसावत आहे.

कार कंपन्या या फीचर्ससह वेगवेगळ्या सुविधा असलेल्या कारगाड्या बाजारात आणत आहे. त्यामुळं आता कार खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्गही पुढे सरसावत आहे.

कार कंपन्या या फीचर्ससह वेगवेगळ्या सुविधा असलेल्या कारगाड्या बाजारात आणत आहे. त्यामुळं आता कार खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्गही पुढे सरसावत आहे.

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : कोरोना महामारीचा प्रभाव हा वाहनखरेदीवरही झाला होता. या काळात वाहनांच्या खरेदी आणि विक्रीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आता अनेक कार कंपन्या या फीचर्ससह वेगवेगळ्या सुविधा असलेल्या कारगाड्या बाजारात आणत आहे. त्यामुळं आता कार खरेदी करण्यासाठी ग्राहकवर्गही पुढे सरसावत आहे.

त्याचाच परिणाम म्हणून आता टाटा, महिंद्रा आणि ओला या कंपन्यांनी आपल्या नवीन फीचर्ससह आणलेल्या वाहनांना लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळं आता गाड्या ऑनलाइन पद्धतीने बुक करून खरेदी करण्याची पद्धत सध्या ट्रेंड होत आहे. त्याचबरोबर ऑटो कंपन्यांनीही ऑफलाइन बुकिंगबरोबर ऑनलाइन बुकिंगचाही पर्याय ग्राहकांना दिला आहे. त्यामुळं गाड्यांची खरेदी वाढत आहे.

Instagram मध्ये मोठी अपडेट, आता डेस्कटॉप-लॅपटॉपवरूनही करता येणार पोस्ट

ओला स्कूटर

ओला कंपनीने ऑटो सेक्टरमध्ये उतरण्याचा निर्णय घेताच त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्कूटर बाजारात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं त्यांनी याची बुकिंगही सुरू केली होती. मागच्या 24 तासांमध्ये या ओला स्कूटरची 1 लाखांपेक्षा लोकांनी ऑनलाइन बुकिंग केली आहे.

महिंद्रा XUV700

महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनेही ग्राहकांना महिंद्रा XUV700 या गाडीसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर केवळ एका तासात 25 हजार SUV ची बुकिंग झाली. दुसऱ्या दिवशीही एवढीच बुकिंग ही 2 तासांत झाली होती.

MG एस्टर

टाटा कंपनीची MG एस्टर या कारच्या लॉन्चिंगपासून फार चर्चा होत होती. कंपनीने ही कार लॉन्च होण्याआधीच ग्राहकांना ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं केवळ 20 मिनिटांत 5 हजार कारचा पहिला स्टॉक संपला होता.

सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव

ग्राहकांना या ऑनलाइन पद्धतीने कार खरेदी करताना वेळ आणि पैशांची बचत होत आहे. त्याचबरोबर घरून आणि आपल्या ऑफिसमधून या गाड्या लोकांना बुक करता येत आहेत. त्याचबरोबर कार खरेदी करताना ऑनलाइन पद्धतीत मिळणाऱ्या बंपर सूट आणि कॅशबॅक ऑफरमुळंही लोक वाहन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत.

First published:

Tags: Car, Online payments, Tata group, Tech Mahindra