नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. परंतु अद्यापही काही लोकांना आधार-पॅन लिंक (PAN - Aadhaar Link) करण्यासाठी समस्या येत आहेत. या दोन डॉक्युमेंट्सच्या डिटेल्समधील फरकामुळे या अडचणी येऊ शकतात. पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचं पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याचं सांगितलं जात आहे. मुदतीआधी तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट होऊ शकतं. त्याशिवाय पॅन आधारशी जोडण्यासाठी 1000 रुपयेही द्यावे लागतील. यामुळे पॅन-आधार लिंक होत नाही - पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी नाव, जन्मतारीख, OTP मिळवण्यासाठी मोबाइल नंबर यासारखे डिटेल्स दोन्ही डॉक्युमेंट्सवर मॅच होत नसतील, तर युजर्सला दोघांच्या लिंकसाठी समस्या येऊ शकतात.
हे वाचा - नवा आयफोन घ्यायचाय? जरा थांबा येतोय Apple चा सर्वात स्वस्त 5G iPhone
अशी होईल मदत - पॅन कार्डवरील डिटेल्स मॅच होत नसतील, तर टॅक्सपेयर्स संबंधित अथॉरिटीकडे याबाबत मदत मिळू शकते. इथे पॅन कार्डसंबंधी कोणतीही माहिती मिसमॅच असेल, तर लगेच बदल केले जातात आणि ही समस्या सोडवली जाते. आधार कार्ड युजर्स आधार सेवा केंद्रात (Aadhaar Seva Kendra) जावून वेबसाइटद्वारे डिटेल्स अपडेट करू शकता.
हे वाचा - आता रुग्णालयातही बनणार Aadhaar Card, मराठी भाषेत देखील असणार आधार कार्डवर माहिती
ऑनलाइन असं लिंक करा PAN-Aadhaar - - सर्वात आधी Income Tax वेबसाइटवर जा. - आधारवर असलेलं नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर टाका. - आधार कार्डमध्ये केवळ जन्मतारीख दिली असल्यास समोर असलेल्या बॉक्सवर टिक करा. - आता कॅप्चा कोड एंटर करा. - आता Link Aadhaar वर क्लिक करा. त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल. दरम्यान, UIDAI ने आधारसंबधी नवी सुविधा देण्याचा विचार केला आहे. आता रुग्णालयातच नवजात बाळाचं आधार कार्ड बनवण्याची (Aadhaar Card in Hospital) सुविधा दिली जाण्यावर विचार सुरू आहे. सध्या नवजात बाळाच्या आधार कार्डसाठीची (New Born Baby Aadhaar Card) सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या डिस्चार्ज स्लिपद्वारे लहान मुलाचं आधार कार्ड बनवावं लागतं. त्यासाठी आधार सेंटरवर जावं लागतं. नवजात बाळाच्या जन्मावेळी, लगेच रुग्णालयातच आधार कार्डची सुविधा मिळाल्यास लोकांची मोठी मदत होईल. तसंच बाळाचं आधार कार्डही सहजपणे तयार होईल.