नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. खासगी, सरकारी सर्व कामांसाठी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड आवश्यक आहे. UIDAI ने आधारसंबधी नवी सुविधा देण्याचा विचार केला आहे. आता रुग्णालयातच नवजात बाळाचं आधार कार्ड बनवण्याची (Aadhaar Card in Hospital) सुविधा दिली जाण्यावर विचार सुरू आहे. सध्या नवजात बाळाच्या आधार कार्डसाठीची (New Born Baby Aadhaar Card) सुविधा रुग्णालयात उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या डिस्चार्ज स्लिपद्वारे लहान मुलाचं आधार कार्ड बनवावं लागतं. त्यासाठी आधार सेंटरवर जावं लागतं. परंतु UIDAI ची अशी योजना आहे, की बाळाच्या जन्मासह आधार कार्ड दिलं जावं, ज्याद्वारे बायोमेट्रिकही पूर्ण होईल. यासाठी UIDAI बर्थ रजिस्ट्रारसह मिळून ही सुविधा रुग्णालयात देण्यासाठी काम करत आहे. नवजात बाळाच्या जन्मावेळी, लगेच रुग्णालयातच आधार कार्ड सुविधा मिळाल्यास लोकांची मोठी मदत होईल. तसंच बाळाचं आधार कार्डही सहजपणे तयार होईल.
हे वाचा - गृह मंत्रालयाच्या Cyber Dostकडून अलर्ट,Onlineऔषधं मागवताना या गोष्टी लक्षात ठेवा
दररोज होतो 2.5 कोटी मुलांचा जन्म - UIDAI चे सीईओ (UIDAI CEO) सौरभ गर्ग यांनी सांगितलं, की भारतात दररोज जळपास 2.5 कोटी मुलांचा जन्म होतो. अशात रुग्णालयातच जन्म झालेल्या बाळाचा फोटो काढून आधार कार्ड जारी केलं जावं अशी UIDAI ची योजना आहे. यामुळे बाळाच्या आई-वडिलांना मोठी सुविधा होईल आणि वेळही वाचेल. यासाठी UIDAI बर्थ रजिस्ट्रारसह काम करेल. त्यासाठीची चर्चा सुरू असून लवकरच या मुद्द्यावर मोठा निर्णय होऊ शकतो.
हे वाचा - एकाच मोबाइल नंबरवरुन तयार होईल संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC Card, असा करा अर्ज
UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी दिलेल्य माहितीनुसार, आता प्रादेशिक भाषेतही आधार कार्ड बनवण्यात येणार आहे. सध्या आधार कार्डवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहिती असते. परंतु आता इतर भाषांमध्येही आधार कार्ड उपलब्ध होईल. लवकरच आधार कार्डवर मराठी, पंजाबी, तमिल, तेलुगु, मल्याळम, कन्नड, उडिया सारख्या भाषांमध्येही आधार कार्ड धारकाचं नाव आणि इतर डिटेल्स पाहता येतील.