नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : अॅपलच्या (Apple) फोनकडे स्टेटस सिम्बोल म्हणून पाहिलं जातं. या फोनची मोठी क्रेझ असून हे फोन महाग असल्याने अनेकांना घेताच येतो असं होत नाही. पण आता तुम्ही आयफोन (iPhone) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. बाजारात सर्वात स्वस्त 5G iPhone लाँच होणार असल्याची माहिती आहे.
Apple च्या iPhone SE 13 बाबत मार्केटमध्ये मोठी चर्चा आहे. या स्मार्टफोनचं ट्रायल प्रोडक्शन आता सुरू होणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा iPhone a15 बायोनिक चिप 3GB रॅमसह लाँच होईल. तसंच iPhone SE 13 4GB रॅम वेरिएंटसह देखील लाँच केला जाऊ शकतो.
स्मार्टफोनला 4.7 इंची रेटिना HD LCD डिस्प्ले असू शकतो. तसंच एक होम बटण फिंगरप्रिंट सेंसरसह ऑफर केलं जाऊ शकतं. फोनला Face ID फीचर दिलं जाणार नाही, अशी माहिती आहे. फोनला 12 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.
जे युजर्स iPhone चं टॉप मॉडेल खरेदी करू शकत नाही, ज्यांचं बजेट कमी आहे, ते हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या बजेट फोनमध्ये चांगल्या फीचर्ससह 5G कनेक्टिविटीही ऑफर केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन मार्चमध्ये लाँच होऊ शकतो. Apple 8 मार्च रोजी आपला लाँच इवेंट करणार आहे. या इवेंटमध्ये हा नेक्स्ट जनरेशन iPhone SE 3 लाँच होण्याची शक्यता आहे.
iPhone SE 3 शिवाय Apple मार्चमध्ये अपग्रेडेड iPad लाँच करेल असा दावा करण्यात आला आहे.
भारतात टेलिकॉम कंपन्या 5G टेक्नोलॉजी लाँच करण्याच्या दिशेने काम करत आहे. अशात Apple देखील 5G फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. iPhone SE 3 5G टेक्नोलॉजीसह लाँच होणारा सर्वात स्वस्त आयफोन असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Iphone, Smartphone, Tech news