मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Oppo ची Reno 7 Series लाँच; पाहा काय आहेत फीचर्स

Oppo ची Reno 7 Series लाँच; पाहा काय आहेत फीचर्स

स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आगामी Oppo Reno 7 Series च्या लाँचची घोषणा केली आहे.

स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आगामी Oppo Reno 7 Series च्या लाँचची घोषणा केली आहे.

स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आगामी Oppo Reno 7 Series च्या लाँचची घोषणा केली आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आगामी Oppo Reno 7 Series च्या लाँचची घोषणा केली आहे. Oppo ने याबाबत Weibo वर एक पोस्ट करून माहिती दिली होती. नव्या रेनो-सीरीजच्या स्मार्टफोनचं लॉन्चिंग आधी चीनमध्ये झालं असून त्यानंतर इतर देशांमध्ये फोन लॉन्च केला जात आहे. भारतात ही सीरिज 25 नोव्हेंबरला (Oppo Reno 7 Series will launch on 25 November) लाँच करण्यात आली.

Oppo कडून दोन स्मार्टफोन Oppo Reno 7 आणि Reno 7 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सचा कॅमेरा Realme GT Neo 2 सारखा, तर डिझाईन OnePlus Nord 2 सारखं असल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय Oppo Reno 7 pro+ आणि Reno 7 SE लॉन्च करण्यात आले आहेत.

नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone

काय आहेत Oppo Reno 7 Series चे Specifications? 

Oppo Reno 7 मध्ये Punch-Hole Design सह 6.5-इंची Full-HD + OLED Display देण्यात आला आहे. त्यात फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मागच्या बाजूला 64 मेगापिक्सलचा (oppo reno 7 series full specification) ट्रिपल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनला MediaTek Dimension 900 प्रोसेसरही आहे.

रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

तर Reno 7 pro मध्ये मागच्या बाजूला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर रेनो 7 प्रो स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G Processor देण्यात आल्याची माहिती आहे.

Smartphone मधील स्टोरेज फुल झाल्यामुळं त्रस्त आहात? त्यासाठी अशी घ्या काळजी

तर इतर फीचर्स हे ओप्पो रेनो 7 सारखेच असतील. त्याचबरोबर ओप्पो रेनो 7 SE मध्ये 6.43 इंची E3 AMOLED फुल-एचडी+डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे.

काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

यात MediaTek Dimension 920 Chipset देण्यात आला आहे. त्यात 8GB आणि 12GB LPDDR4x रॅम, 128GB किंवा 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. कॅमेरा फीचर्ससाठी यात 64 मेगापिक्सलचा Omnivision OV64B Primary Sensor असेल. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 4300 mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअप आणि 65W चा फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.

First published:

Tags: Mobile Phone, Oppo, Oppo smartphone