नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : प्रसिद्ध चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने मार्केटमध्ये Realme GT 2 Pro हा नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या फीचर्सबद्दल (Realme GT 2 Pro Specifications) कंपनीनं अजून कोणतीही माहिती दिलेली नसताना आता त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. त्यामुळं कंपनीची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर यात काय फीचर्स असतील त्याविषयी जाणून घेऊयात.
Realme GT Pro 2 मध्ये काय असतील फीचर्स?
रियलमी कंपनीचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 898 SoC वर काम करतो. त्यात 6.51-इंचचा फुल एचडी+AMOLED Display देण्यात आला आहे. त्याचबरोबर 20:9 चा Aspect Ratio आणि 404ppi ची पिक्सल डेन्सिटी देण्यात आली आहे. Realme GT Pro 2 हा स्मार्टफोन Android 12 च्या व्हर्जनवर काम करतो.
या स्मार्टफोनमध्ये WIFI 6 आणि ब्लूटूथ v5.2 सारखे दमदार फीचर्सही देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात 50MP कॅमेरा ज्यात Optical image stabilization ची सुविधा असेल. तर 32MP चा फ्रंट कॅमेरा असणार आहे. लीक झालेल्या फीचर्सनुसार या स्मार्टफोनची किंमत ही 46,500 रुपये असेल असं (Realme GT 2 Pro Price in India) बोललं जात आहे. परंतु या सर्व लीक माहितीवर कंपनीनं अजून कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.
काही मिनिटांमध्ये चार्ज हा स्मार्टफोन...
Realme GT Pro 2 या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून 125W चा फास्ट चार्जर सपोर्टही देण्यात आला आहे. याआधी लीक झालेल्या माहितीमध्ये यात 5000mAh & क्षमतेची बॅटरी आणि 65W चा चार्जर सपोर्ट देण्यात येणार असल्याचं माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Realme, Smartphones