मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह कमी बजेटमध्ये मिळतायेत 'हे' Smartphone

नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह कमी बजेटमध्ये मिळतायेत 'हे' Smartphone

तुम्हीही फास्ट चार्जिंग सपोर्ट (Charging support) बॅटरीसह येणारा फोन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या फोनची माहिती घेऊन आलो आहोत

तुम्हीही फास्ट चार्जिंग सपोर्ट (Charging support) बॅटरीसह येणारा फोन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या फोनची माहिती घेऊन आलो आहोत

तुम्हीही फास्ट चार्जिंग सपोर्ट (Charging support) बॅटरीसह येणारा फोन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या फोनची माहिती घेऊन आलो आहोत

  नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : सध्याच्या 'हार्ड अँड फास्ट' युगामध्ये आज उदयाला आलेली टेक्नॉलॉजी (Technology) काही दिवसांतच आउटडेटेड वाटू लागते. आपल्या हातामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन विविध स्मार्टफोन (Smartphone) निर्मात्या कंपन्या सातत्यानं आपल्या प्रॉडक्टमध्ये बदल करतात. विशेषत: फोनच्या बॅटरींमध्ये मोठ्या प्रमाणात अपग्रेडिंग केलं जात आहे. सध्या बहुतांश फोन कंपन्या 4000mAh किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बॅटरी (Battery) वापरतात.

  या बॅटरी मिड-डिव्हाइस 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात. वन प्लस नॉर्ड 2 मध्ये (OnePlus Nord 2) 65Wचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे. यामुळे फक्त 30 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होतो. तुम्हीही फास्ट चार्जिंग सपोर्ट (Charging support) बॅटरीसह येणारा फोन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या फोनची माहिती घेऊन आलो आहोत...

  शाओमी एमआय 11एक्स 5जी (Xiaomi Mi 11X 5G)

  29 हजार 999 रुपये किंमत असलेल्या शाओमीच्या 11एक्स 5जी फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला, 6.67 इंचाचा FHD + डिस्प्ले सपोर्ट उपलब्ध आहे. हा डिस्प्ले स्क्रॅच रेझिस्टंट असून त्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये HDR10+ सपोर्ट आहे. हा फोन अँड्रॉइड 11 (Android 11) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, जो कंपनीच्या स्वतःच्या MIUI 12 नं सुसज्ज आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. एमआय 11एक्समधील प्रायमरी कॅमेरा लेन्स 48 मेगापिक्सेलची आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4 हजार 250mAh बॅटरी आहे.

  वनप्लस नॉर्ड 2 5जी (OnePlus Nord 2 5G)

  या फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे. 1080X2400 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 1200-AI प्रोसेसर असून 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज क्षमता आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित ऑक्सिजन OS 11.3 वर काम करतो. नॉर्ड 2 5जीमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4 हजार 500 mAh बॅटरी मिळते. हा फोन 29 हजार 999 रुपये किमतीला उपलब्ध आहे.

  पोको एफ 3 जीटी 5 जी (Poco F3 GT 5G)

  28 हजार 999 रुपये प्रारंभिक किंमत असलेल्या पोको एफ 3 जीटी स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 480Hz इतका आहे. फोनमध्ये HDR 10 प्लस सपोर्ट आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5 हजार 65mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. या फोनमध्ये ड्युअल स्पीकर, ट्रिपल मायक्रोफोन्स आणि ड्युअल 5जी सपोर्टसारखे अनेक फिचर उपलब्ध आहेत

  रियलमी एक्स7 मॅक्स 5जी (Realme X7 Max 5G)

  रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळतो. त्याच्या अॅस्पेक्ट रेशो 20:9 इतका असून स्क्रीन रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. फोनमध्ये 3 गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 1200 प्रोसेसर आहे. पॉवरसाठी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन फक्त 16 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. या फोनची किंमत 26 हजार 999 इतकी आहे.

  First published:
  top videos

   Tags: Mobile, Smartphone