मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ऑनलाईन पॉर्न पाहता? Google, FB ची तुमच्यावर नजर, असा ट्रॅक होतो तुमचा डेटा

ऑनलाईन पॉर्न पाहता? Google, FB ची तुमच्यावर नजर, असा ट्रॅक होतो तुमचा डेटा

जगभरात हजारो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल आणि फेसबुकसह इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात.

जगभरात हजारो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल आणि फेसबुकसह इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात.

जगभरात हजारो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल आणि फेसबुकसह इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 1 जुलै : जर तुम्ही ऑनलाईन पॉर्न (Online Porn) पाहत असाल आणि याबाबत कोणालाही समजत नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हे चुकीचं आहे. जगभरात हजारो अशा पॉर्न वेबसाईट्स आहे, ज्या आपल्या युजर्सची माहिती गुगल (Google) आणि फेसबुकसह (Facebook) इतर टेक कंपन्यांशी शेअर करतात. असं युजर्सची ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी केलं जातं. एवढंच नाही, तर तुम्ही तुमच्या कंप्यूटर, लॅपटॉपमध्ये Incognito मोडमध्ये पॉर्न पाहत असाल, तर ही अ‍ॅक्टिव्हिटीही ट्रॅक केली जाते. 22 हजारहून अधिक पॉर्न साईट्स स्कॅन - मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्नसिलवॅनिया अँड कार्नेगी मेलॉनच्या रिसर्चर्सने एका रिपोर्टमध्ये सांगितलं, की त्यांनी जगभरात 22,484 अडल्ट कॉन्टॅक्ट असणाऱ्या वेबसाईट्स स्कॅन केल्या आहेत. या सर्व साईट्स युजर्सचा डेटा पुढे फॉर्वर्ड करत असल्याचं आढळलं आहे. अ‍ॅनालिस्ट्सनी असंही सांगितलं, की यापैकी 93 टक्के वेबसाईट्स अशा आहेत, ज्या थर्ड पार्टी कंपन्यांच्या जवळपास सात डोमेनसह युजर्सचा डेटा शेअर करत आहेत. या रिपोर्टमध्ये केवळ 17 टक्के वेबसाईट्स अशा आहेत, ज्या एनक्रिप्शनचा वापर करतात असंही सांगण्यात आलं. गुगल, फेसबुक  - या 93 टक्के वेबसाईट्समध्ये 74 टक्के पॉर्न वेबसाईट्स अशा होत्या ज्यांना गुगल आणि त्यांच्या कंपन्या ट्रॅक करत होत्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी ऑरेकलनेही 24 टक्के पॉर्न साईट्स ट्रॅक केल्याचं आढळलं आहे. युजर्सकडून सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकही रिसर्चर्सच्या स्कॅनिंगमध्ये प्रत्येकी 10 पैकी एका पॉर्न साईटचं ट्रॅकिंग करताना आढळलं आहे.

(वाचा - OK Google बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं, गुगलचा मोठा खुलासा)

प्रायव्हसी पॉलिसी - रिसर्चर डॉ. मॅरिस यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीत सांगितलं, की पॉर्न साईट्सवर युजर्सला ज्याप्रमाणे ट्रॅक केलं जातं, त्यानुसार ऑनलाईन रिटेलमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीला किती धोका आहे, हे समजू शकतं. युजर्सची अशी खासगी बाब ट्रॅक करणं योग्य नसून त्या युजरला हे माहितीच नाही, की त्यांना टेक कंपन्यांकडून ट्रॅक केलं जात आहे. जगभरात केवळ 17 टक्के पॉर्न साईट्स प्रायव्हसी पॉलिसी फॉलो करतात. या डेटाचं काय होतं? युजर्सचं ट्रॅकिंग करुन जमा केलेल्या डेटाचं नेमकं काय होतं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुगल आणि फेसबुक पॉर्नोग्राफी वेबसाईट्ससाठीचा वापर केलेल्या युजरचा डेटा अ‍ॅडव्हर्टायजिंग प्रोफाईल डेव्हलप करण्यासाठी वापर करत असाव्या.

(वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

गुगल, फेसबुककडून ट्रॅकिंग करण्याबाबत नकार - याबाबत गुगलच्या एका प्रवक्त्याने न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितलं, की आम्ही अ‍ॅडव्हर्टायजिंग प्रोफाईल डेव्हलप करण्यासाठी काम करत नाही. गुगल कोणत्याही अडल्ट कंटेन्ट वेबसाईटच्या अ‍ॅड्स दाखवण्याच्या विरोधात आहे. व्यवसायासाठी अशाप्रकारे अडल्ट वेबसाईट्स ट्रॅक करण्याची परवानगी कंपनी देत नाही. कसा ट्रॅक होतो तुमचा डेटा? ऑनलाईन ट्रॅकिंगमध्ये अशा युजर्सला अधिक ट्रॅक केलं जात, जे एखादी वेबसाईट दररोज पाहतात. ट्रॅकिंगसाठी कंपन्या वेबसाईटवर लहान टेक्स्ट फाईल आणि कुकीज देतात, ज्या साईट व्हिजिट दरम्यान युजरच्या डिव्हाईसवर डाउनलोड होतात. डाउनलोड झालेल्या या फाईल युजरला एखाद्या साईटवर लॉगइन ठेवण्यासह त्यांचे प्रेफरन्स ओळखून जाहिराती दाखवण्याचं काम करतात.
First published:

Tags: Google, Tech news

पुढील बातम्या