मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भारतात OnePlus 10 Pro ची विक्री सुरू, पहिल्या Sale मध्ये अशी मिळेल 11 हजारांची सूट

भारतात OnePlus 10 Pro ची विक्री सुरू, पहिल्या Sale मध्ये अशी मिळेल 11 हजारांची सूट

OnePlus 10 Pro आकर्षक डिझाइन, जबरदस्त फीचर्स आणि चांगला कॅमेरा-फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. आजपासून या फोनची विक्री सुरू झाली असून काही ऑफर्सही (OnePlus 10 Pro Offer) आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 एप्रिल : भारतात OnePlus 10 Pro ची विक्री आजपासून सुरू झाली आहे. वनप्लसने 31 मार्च रोजी OnePlus 9 Pro आणि OnePlus 10 Pro 5G लाँच केला होता. OnePlus 10 Pro आकर्षक डिझाइन, जबरदस्त फीचर्स आणि चांगला कॅमेरा-फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. आजपासून या फोनची विक्री सुरू झाली असून काही ऑफर्सही (OnePlus 10 Pro Offer) आहेत.

तुम्ही नवा, प्रीमियम फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी वनप्लसचा हा नवा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. OnePlus 10 Pro Amazon वर खरेदी करता येईल. तसंच पॉप-अप स्टोअर्समध्येही फोन खरेदी करता येईल. लाँच ऑफरमध्ये SBI क्रेडिट कार्ड युजर OnePlus 10 Pro वर 4500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. त्याशिवाय 5000 रुपयांची आणखी सूट मिळवण्यासाठी तुमचा जुना अँड्रॉइड स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. तसंच तुमचा जुना वनप्लस स्मार्टफोन असल्यास 2000 रुपये अधिक मिळू शकतात.

OnePlus 10 Pro दोन वेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. फोनच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 66,999 रुपयांपासून सुरू होते. 12GB + 256GB मॉडेलची किंमत 71,999 रुपये आहे. परंतु वरील संपूर्ण ऑफर्स मिळाल्यास 66,999 रुपयांचा फोन 55,499 रुपयांत खरेदी करता येईल.

हे वाचा - एका आठवड्यात दुसऱ्यांदा स्वस्त झाला OnePlus चा 50MP कॅमेरा असणारा जबरदस्त फोन, पाहा किंमत, फीचर्स

काय आहेत फीचर्स -

- स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट

- 12GB पर्यंत LPDDR5 रॅम

- 128GB किंवा 256GB UFS 3.1 स्टोरेज

- Android 12 वर Oxygen OS 12.1

- 6.7-इंची QHD+ (3216×1440 पिक्सल) डिस्प्ले

- 5,000 mAh बॅटरीसह 80W सुपरवोक वायर्ड चार्जिंग आणि 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंग

- डॉल्बी एटमॉस सपोर्टसह डुअल स्टीरियो स्पीकर

- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर

- डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंग

हे वाचा - स्वस्तात मिळतोय iPhone 13, पाहा काय आहे डिस्काउंट ऑफर

कॅमेरा -

OnePlus 10 Pro फोनला 48 मेगापिक्सल IMX 789 प्रायमरी सेंसर f/1.8 अपर्चरसह आहे. मेन कॅमेरा 50 मेगापिक्सल सॅमसंग ISOCELL JN1 अल्ट्रावाइड शूटरसह 150-डिग्री FoV आणि 8 MP टेलीफोटो यूनिट f / 2.4 अपर्चरसह 3.3x ऑप्टिकल झूम आणि OIS सह जोडण्यात आलं आहे. सेल्फीसाठी फोनला 32 मेगापिक्सल Sony IMX615 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

First published:

Tags: Oneplus, Smartphone, Tech news