जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / एका आठवड्यात दुसऱ्यांदा स्वस्त झाला OnePlus चा 50MP कॅमेरा असणारा जबरदस्त फोन, पाहा किंमत, फीचर्स

एका आठवड्यात दुसऱ्यांदा स्वस्त झाला OnePlus चा 50MP कॅमेरा असणारा जबरदस्त फोन, पाहा किंमत, फीचर्स

एका आठवड्यात दुसऱ्यांदा स्वस्त झाला OnePlus चा 50MP कॅमेरा असणारा जबरदस्त फोन, पाहा किंमत, फीचर्स

OnePlus 10 सीरिज लाँच झाल्यानंतर OnePlus 9 सीरिजची किंमत कमी झाली आहे. आता भारतात OnePlus 10 Pro 5G ची किंमत कमी झाली आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा हा फोन स्वस्त झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 एप्रिल : OnePlus 10 सीरिज लाँच झाल्यानंतर OnePlus 9 सीरिजची किंमत कमी झाली आहे. OnePlus 9 Pro मागील वर्षी फ्लॅगशिप डिव्हाइस म्हणून लाँच करण्यात आला होता. आता भारतात OnePlus 10 Pro 5G ची किंमत कमी झाली आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा हा फोन स्वस्त झाला आहे. त्यामुळे तुम्ही नवा प्रीमियम फोन घेण्याचा विचार करत असाल, तर वनप्लसचा हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. OnePlus 9 Pro 5G दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 8GB + 128GB आणि 12GB + 256GB आहे. 8GB वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आणि 12GB ची किंमत 64,999 रुपये होती. परंतु आता किंमत कमी झाल्यानंतर OnePlus 9 Pro च्या 8GB वेरिएंटची किंमत 54,199 रुपये आहे. तर 12GB वेरिएंटची किंमत 59,199 रुपये आहे.

हे वाचा - आता 28 नाही 30 दिवसांचा असेल Mobile Recharge, ग्राहकांच्या तक्रारीनंतर TRAI चे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

OnePlus 9 Pro 5G मध्ये 6.7 इंची QHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रेजोल्यूशन 1440×3216 पिक्सल आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर बेस्ड Oxygen OS 11 वर काम करतो. या फोनला ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच डिस्प्ले LTPO टेक्नोलॉजीसह असून स्मार्ट 120Hz फीचर ऐनेबल आहे. OnePlus 9 Pro 5G ची नवी किंमत आता OnePlus च्या अधिकृत वेबसाइटसह Amazon वरही उपलब्ध आहे. OnePlus 9 Pro 5G तीन कलर वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. ज्यात एस्ट्रल ब्लॅक, आर्कटिक स्काय आणि विंटर मिस्ट सामिल आहे.

हे वाचा -  Oneplus Nord 2 मध्ये पुन्हा ब्लास्ट, फोनवर बोलता बोलता झाला स्फोट; यूजर जखमी

कॅमेरा - OnePlus 9 Pro 5G फोनला रियर पॅनलमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा Sony IMX789 प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/1.8 तसंच 50 मेगापिक्सल Sony IMX766 सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे, जो अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेन्ससह येतो. OnePus 9 Pro 5G मध्ये 4500mAh बॅटरी असून 65W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात