नवी दिल्ली, 4 एप्रिल : नवा iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या फायद्याची बातमी आहे. रिलायन्स डिजीटल स्टोर iPhone 13 वर एक धमाकेदार ऑफर (iPhone 13 Discount Offer) देत आहे. रिलायन्स डिजीटलने डिजीटल डिस्काउंट डेज (Reliance Digital Discount Days) नावाने एका सेलची घोषणा केली आहे. हा सेल 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. डिजीटल डिस्काउंट डेजमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिनसह इतर कॅटेगरीवर मोठी सूट आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोरवरही डील्स पाहता आणि खरेदी करता येईल. त्याशिवाय काही निवडक कार्ड्सवर बँक डिस्काउंटही आहे. HDFC बँक कार्ड आणि 2000 रुपयांपर्यंतच्या कूपनवर 7.5 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट आहे. त्याशिवाय कंपनी 80000 आणि त्यावरील खरेदीवर 10000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. तसंच ऑफर-डिस्काउंटसह EMI ऑप्शनही उपलब्ध आहे. iPhone 13 Offer - iPhone 13 128GB वेरिएंट 61,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत उपलब्ध आहे. फोनची रिटेल किंमत 74999 रुपये आहे. नव्या किमतीत कॅशबॅक, इन-स्टोर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर सामिल आहे.
हे वाचा - Oneplus Nord 2 मध्ये पुन्हा ब्लास्ट, फोनवर बोलता बोलता झाला स्फोट; यूजर जखमी
iPhone 13 Croma Offer - त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टोर Croma मध्येही iPhone 13 वर ऑफर आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Amazon वरही iPhone वर मोठी सूट असते. पण iPhone 13 तुम्ही Croma मधून खरेदी केल्यास चांगली सूट मिळू शकते. 128GB वेरिएंट iPhone 13 ची मार्केटमधील किंमत 79,900 रुपये आहे. परंतु हा फोन क्रोमामध्ये 5910 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल. यात फोनची किंमत 73,990 रुपये होईल. त्याशिवाय ICICI Bank, Kotak Bank किंवा SBI Bank च्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आणखी 6 हजार रुपयांची सूट मिळेल. अशाप्रकारे एकूण 11,910 रुपये डिस्काउंटनंतर iPhone 13 तुम्ही 67,990 रुपयांत खरेदी करू शकता.
हे वाचा - बंपर ऑफर! 36 हजारहून अधिक डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल iPhone 13; पाहा काय आहे डील
काय आहेत 128GB iPhone 13 फीचर्स - - 6.1 इंची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले - A15 बायोनिक चिप - फ्रंट कॅमरा 12MP - रियर अल्ट्रा-वाइड कॅमेरा 12MP आहे. तसंच वाइड टेलीफोटो कॅमरा, नाइट मोड आणि स्मार्ट HDR 4 सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.