जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता Alexa भरणार तुमचं वीज, पाणी, केबलचं बिल; काय असेल प्रक्रिया?

आता Alexa भरणार तुमचं वीज, पाणी, केबलचं बिल; काय असेल प्रक्रिया?

आता Alexa भरणार तुमचं वीज, पाणी, केबलचं बिल; काय असेल प्रक्रिया?

‘Alexa विजेचं बिल भर’ … हे आता शक्य होणार आहे. व्हर्च्युअल असिस्टंटच्या माध्यमातून लाईट, पाणी आणि DTH यांचं बिल तुम्ही भरू शकाल. काय आहे बिल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर :  Amazon ने Virtual assist लाँच केला होता. अमेझॉनची ही Alexa आता भारतातही लोकप्रिय होत आहे. कारण अलेक्साची काही नवी फीचर भारतासाठी लाँच करण्यात आली आहेत. नवीन फीचरमुळे लाईट, पाणी, पोस्टपेड मोबाईल, गॅस तसंच DTH या सारख्या सेवांना सपोर्ट देण्यात आला आहे. आता या सेवांची बिलं भरण्यासाठी तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. अलेक्सा ते काम करून टाकेल. तुम्ही फक्त एक व्हॉइस कमांड दिलीत की अलेक्सा ही बिलं भरण्याची कामं करून टाकेल.

Amazon Pay  वापरतात अशा यूजर्सनी आपल्या Amazon Echo, Fire TV Stick या सारख्या उपकरणामध्ये इनबिल्ड असलेल्या Alexa ला आवाजाच्या माध्यमातून कमांड द्यायची आहे. उदा, Alexa, pay my mobile bill किंवा Alexa, pay my electricity/water/broadband) bill अशा प्रकारे Alexa तुमचे बिल भरण्यासाठी मदत करू शकते.

वेळेची बचत

या फीचरमुळे बिल भरण्याची प्रक्रिया सोप्पी होईल.

वाचा - कोट्यवधी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक होऊ शकतो बंद, 31 ऑक्टोबरपर्यंतचीच आहे मुदत

हे फीचर लाईट पाणी, पोस्टपेड मोबाईल, गॅस तसेच DTH या, सारख्या सेवांना सपोर्ट करणार आहे. Amazon India चे व्यवस्थापक पुनिश कुमार म्हणतात की, Alexa च्या नवीन फीचरमुळेAmazonpay वापरणाऱ्या ग्राहकांचा वेळ वाचेल.कंपनीने हे फीचर फक्त भारतामध्ये लाँच केलं आहे.

बिल भरण्याची प्रक्रिया

Alexa, Amzon pay users च्या रजिस्टर Amazon खात्यात बिलाची रक्कम रिट्रीव केली जाईल आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकाची परवानगी घेईल.

वाचा - सावधान! गुगलची ‘ही’ सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब Alexa App वर आवाजाच्या स्वरूपात पासवर्ड निर्माण करता येईल. यामुळे व्यवहारसुरक्षित होतील.पासवर्ड मान्यता मिळाल्यावर Alexa, Amazon pay च्या माध्यमातून व्यवहार पूर्ण होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाली की ग्राहकांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर नोटिफिकेशन येईल.

-————————————————-

अन्य बातम्या

सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल

‘या’ एका कारणामुळं भारतात लॉंच झाला नाही Google Pixel 4 मोबाइलवर VIDEO EDIT करण्यासाठी स्मार्ट आयडिया, डाउनलोड करा ही Apps

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात