‘या’ एका कारणामुळं भारतात लॉंच झाला नाही Google Pixel 4

‘या’ एका कारणामुळं भारतात लॉंच झाला नाही Google Pixel 4

तुम्ही Google Pixel 4ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : गुगलनं नुकतेच Pixel 4 आणि 4XL हे दोन फोन न्यूयॉर्कमध्ये लॉंच केले. मात्र तुम्ही या फोनची वाट भारतात पाहत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण हा फोन भारतात लॉंच केला जाणार नाही आहे.

गुगलनं आपल्या अधिकृतरित्या अशी माहिती दिली आहे की Pixel 4 भारत येणार नाही. याचे कारण म्हणजे Pixel 4मध्ये असलेले Soli Radar Chip. या चीपच्या मदतीनं मोशल सेंस आणि फेस अनलॉक असे फिचर काम करतात. त्याचबरोबर गुगलनं, जगात असे अनेक प्रोडक्ट आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे Pixel 4 भारतात येणार नाही आहे. त्याशिवाय भारतात येत्या काळात वेगळा एक Pixel फोन लॉंच केला जाणार आहे.

वाचा-फेस्टिव्हल ऑफर : 14,999 रुपयांच्या Xiaomi फोनवर 8,450 रुपयांची सूट!

या कारणामुळं भारतात लॉंच झाला नाही गुगल Pixel 4

गुगल Pixel 4/4XL भारतात न आणण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे 60Ghz स्पेक्ट्रम आहे. या सिस्टमला भारतात परवानगी दिलेली नाही. भारतात सध्या फक्त 60Hz फ्रिक्वेंसी उपलब्ध आहे. Google Pixel 4मध्ये Soli Radar देण्यात आला आहे. हा 60Hz mmwWave फ्रिक्वेंसी वापरतो. गुगलनुसार हे सिस्टम फक्त अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, तैवान आणि काही युरोपियन देशात काम करते. तर, जपानमध्ये 2020पर्यंत Pixel 4 येण्याची अपेक्षा आहे. भारतात या सिस्टमला परवानगी नसल्यामुळं Pixel 4 लॉंच करण्यात आला नाही.

वाचा-सॅमसंग 48 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

गुगल Pixel 4चे महत्त्वाचे फिचर

नव्या गुगलमध्ये मोशन सेंससोबतच जेस्टर कंट्रोल हे नवे फिचरही देण्यात आले आहे. या फिचरचा वापर गेमिंग आणि डिजीटल वापरासाठी करण्यात येऊ शकतो. त्यामुळं गेमींग आणि फोटोग्राफीसाठी नवा गुगल Pixel 4 जास्त फायद्याचा आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये अशी एक चीप लावण्यात आली आहे, ज्यामुळं तुमचा डेटा नेहमीच सुरक्षित राहू शकतो.

वाचा-Amazon: 5 दिवस बंपर धमाका! महागडे फोन स्वस्तात घेण्याची सुवर्णसंधी

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या