जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल

सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल

सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल

सावधान! पॉर्न व्हिडिओ पाहाणं किंवा सेक्स व्हिडिओ शूट करणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: इंटरनेटचा जेवढा चांगला वापर होते त्यापेक्षा अधिक वापर हा गैरमार्गानं पैसे मिळवणं आणि खासगी आयुष्यातील गोष्टी हॅक करून खंडणी मागण्यासाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार एका अहवालातून समोर आला आहे.  ग्लोबल सायबर सिक्युरिटी फर्म चेकपॉईंट या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार Phorpiex नावाच्या हॅकरची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे युझर्सना एका तासाला 30 हजार ई मेल धमक्यांचे ई मेल पाठवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे हॅकर्स ई-मेलच्या माध्यमातून युझर्सला सेक्स व्हिडिओ लिक करण्याची धमकी देतात. त्यांना युझर्सच्या सोशल अकाऊंटची सगळी माहिती आधीच असल्याचं समोर आलं आहे. या माहितीच्या आधारे त्याचे पासवर्ड आणि खास क्षण हॅक करतात सेक्स व्हिडिओ लिक करण्याची धमकी दिली जाते. मागच्या 5 महिन्यांमध्ये तब्बल Phorpiex च्या खात्यांमध्ये 1 लाख 10 हजार डॉलर्स ट्रान्सफर झाल्याची माहिती समोर आली आहे. हा बॉटनेट गेल्या 10 वर्षांपासून सक्रीय असल्याचं समजलं जातं. तर गेल्या 3 वर्षांत याचं प्रमाण वाढलं असून ते युझर्सला आपल्या जाळ्यात ओढतात. तुम्हाला पॉर्न पाहण्याची सवय असेल किंवा तुम्ही वेबकॅमवरुन सेक्सचे व्हिडिओ शूट केले असतील किंवा तयार करण्याच्या विचारात असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतात. त्यामुळे अशाप्रकारच्या प्रलोभनापासून वेळीच सावध व्हा. कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवरुन ई-मेल डेटाबेस मिळवले जातात. त्यातून एका मेलची निवड केली जाते. त्याला मेलवर स्पॅम मेलच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारचे मेल पाठवले जातात. एकाच वेळी 2 कोटी 70 लाखांहून अधिक युझर्सना आपल्या जाळ्यात ओढळलं जावू शकतं. काही अॅप हॅक झाल्यामुळे युझर्सची माहिती आणि पासवर्ड आधीच लीक झाला आहे. अशा हॅकर्स पासून वाचण्याठी तुमच्या सोशल साईटचा गैरवापर करणं टाळा. मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सोशल साईटवर सिक्युरिटी आणि पासवर्डबाबत अवेअर रहा. पासवर्ड एकच न ठेवता सारखा बदलत राहा आणि तुम्ही जर कोणत्याही प्रकारची चूक न करता अशा प्रकारे खंडणीसाठी तुम्हाला मेल आला तर तत्काळ सायबर क्राईम ब्रांचकडे तक्रार करायला विसरु नका. राज्यात कोण होणार मुख्यमंत्री? अमित शहा यांची UNCUT मुलाखत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात