सावधान! गुगलची 'ही' सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब

सावधान! गुगलची 'ही' सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब

Google च्या लोकप्रिय सेवेत बग आढळला असून त्यामुळे फोन तसाच चालू राहत असून यामुळे बॅटरी आणि स्क्रीन खराब होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : गेल्या काही महिन्यांपासून गुगलने मलिशिअस अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यास सुरुवात केली आहे. फोनमधील डेटा चोरी, व्हायरस या कारणांमुळे गुगल कारवाई करत आहे. दरम्यान आता गुगल असिस्टंटमध्ये बग आढळला आहे. यामध्ये गुगल असिस्टंट ऑन केल्यानंतर 'Hey Google' असं म्हणताच स्क्रीन फ्रीज होत आहे. बगमुळे स्क्रीन फ्रीज राहून फोन तसाच ऑन राहतो. यामुळे फोनची बॅटरी वेगानं संपते. काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, यामुळे फोनचा डिस्प्लेसुद्धा खराब होऊ शकतो.

गुगल असिस्टंटमधील या बगमुळे युजर्सची मोठी अडचण झाली आहे. गुगल असिस्टंटला कनेक्ट असलेल्या स्मार्ट डिव्हाइसचा वापर करणं कठीण झालं आहे. अँड्रॉइड पोलिस या वेबसाइटने म्हटलं आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे फोन 'हे गूगल' कमांड दिल्यानंतर सुरूच आहेत.

बगचा फोनच्या बॅटरीला मोठा धोका आहे. गूगल असिस्टंटमधील हा बग फोनची स्क्रीन ऑन ठेवतो. त्यामुळे फोन लॉकसुद्धा करता येत नाही. कमांड देताच फोनची स्क्रीन फ्रीज होते. यामुळे युजर फोनचा वापर करू शकत नाही. इनबिल्ट बॅटरी असलेल्या डिव्हाइसला ऑफदेखील करता येत नाही.

दरम्यान, हा बग सप्टेंबरमध्ये सापडल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप गुगलकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गुगलच्या सपोर्ट फोरमवर अनेक युजर्सनी तक्रार केली होती. गुगलने प्रतिक्रिया न दिल्यानं हा बग कधीपर्यंत फिक्स केला जाईल हे सांगता येत नाही.

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Google
First Published: Nov 9, 2019 07:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading